पाटणा: बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल हळूहळू स्पष्ट होऊ लागला आहे. सध्याच्या घडीला एनडीएनं आघाडी घेतली आहे. भारतीय जनता पक्ष ७७, तर संयुक्त जनता दल ४३ जागांवर पुढे आहे. तर राष्ट्रीय जनता दलाचे उमेदवार ६८ मतदारसंघांत आघाडीवर आहेत. काँग्रेस १८ जागांवर पुढे आहे. त्यामुळे महागठबंधन पिछाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे....म्हणून नितीश कुमारांनी शिवसेनेचे आभार मानावेत; संजय राऊतांनी सांगितलं राजकारणबिहारमध्ये राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस यांच्या महागठबंधनचं सरकार येईल, असा अंदाज जवळपास सर्वच एक्झिट पोल्सनी वर्तवला होता. मात्र आता तो चुकीचा ठरताना दिसत आहे. या निवडणुकीत राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी संपूर्ण ताकद पणाला लावली होती. त्यांनी जवळपास २५० सभा घेतल्या होत्या. मात्र यादव यांच्या तुलनेत काँग्रेसनं फार जोर लावला नाही. त्यामुळेच महागठबंधनला अपेक्षित जागा मिळाला नसल्याचं मत राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत. बिहार निवडणुकीत शिवसेनेची तुतारी वाजलीच नाही; सर्व २२ उमेदवारांना ‘नोटा’पेक्षाही कमी मतदानगेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं ४० जागा लढवल्या होत्या. त्यातल्या २७ जागा काँग्रेसनं जिंकल्या. यंदा त्यांनी ७० जागा लढवल्या आहेत. मात्र यातल्या केवळ १९ जागांवर पक्षाचे उमेदवार आघाडीवर आहेत. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी पुन्हा एकदा अपयशी ठरले आहेत. राहुल यांनी बिहारमध्ये ८ सभा घेतल्या. त्याचा परिणाम विधानसभेच्या ५२ जागांवर दिसणं अपेक्षित होतं. यातल्या ४२ जागांवर महागठबंधनचे उमेदवार पिछाडीवर आहेत. तर केवळ १० जागांवर महागठबंधनला आघाडी मिळाली आहे. त्यामुळे राहुल गांधी पुन्हा एकदा निष्प्रभ ठरल्याचं दिसत आहे.मोदींच्या 'हनुमाना'चा मित्रपक्षाला फटका; भाजपमुळे जेडीयूला अर्धा डझनचा झटका?बिहार विधानसभा निवडणुकीसाठी दिल्लीतून आलेल्या काँग्रेसच्या टीमनं राज्यभर दौरे केले. त्यांनी ५९ सभा घेतल्या. राहुल यांनी दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात प्रत्येकी चार अशा आठ सभा घेतल्या. राहुल यांनी दुसऱ्या टप्प्यात हिसुआ, कहलगाव, कुशेश्वरस्थान आणि वाल्मिकीनगरमध्ये जनसभा घेतल्या. तर तिसऱ्या टप्प्यात राहुल यांनी कोढा, किशनगंज, बिहारीगंज आणि अररियामध्ये सभांना संबोधित केलं.
Bihar Assembly Election Results: राहुल गांधी 'पुन्हा फ्लॉप'; सभा झालेल्या ५२ पैकी ४२ जागांवर महागठबंधन पिछाडीवर
By कुणाल गवाणकर | Published: November 10, 2020 5:37 PM