Bihar Assembly Election Results: शिवसेनेनं आपलं तोंड बंद ठेवावं; दोन संजय भिडले, आजी-माजी कार्यकारींमध्ये 'सामना'

By कुणाल गवाणकर | Published: November 10, 2020 08:23 PM2020-11-10T20:23:41+5:302020-11-10T20:36:33+5:30

Bihar Assembly Election Results: बिहार विधानसभा निवडणूक निकालावरून संजय विरुद्ध संजय

Bihar Assembly Election Results congress leader sanjay nirupam slams shiv sena mp sanjay raut | Bihar Assembly Election Results: शिवसेनेनं आपलं तोंड बंद ठेवावं; दोन संजय भिडले, आजी-माजी कार्यकारींमध्ये 'सामना'

Bihar Assembly Election Results: शिवसेनेनं आपलं तोंड बंद ठेवावं; दोन संजय भिडले, आजी-माजी कार्यकारींमध्ये 'सामना'

Next

मुंबई: काँग्रेसनं चांगली कामगिरी केली असती, तर तेजस्वी यादव आतापर्यंत मुख्यमंत्री झाले असते, असं विधान करणाऱ्या शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी जोरदार टीका केली आहे. काँग्रेसला सल्ले देण्यापेक्षा शिवसेनेनं आपलं तोंड बंद ठेवावं, अशा शब्दांत निरुपम यांनी राऊत यांना सुनावलं आहे.

२, १२ अन् १६... बिहारमध्ये टफ फाईट; ३० जागांमुळे वातावरण टाईट

बिहारमध्ये काँग्रेसनं राष्ट्रीय जनता दलासोबत विधानसभा निवडणूक लढवली. त्यावर भाष्य करताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसच्या निराशाजनक कामगिरीवर बोट ठेवलं. त्यावरून निरुपम यांनी राऊत यांचा समाचार घेतला आहे. 'शिवसेनेनं बिहारमध्ये २२ जागांवर निवडणूक लढवली. त्यातल्या २१ जागांवर त्यांना नोटापेक्षा कमी मतं मिळाल्याचं ऐकून आहे. त्यामुळे काँग्रेसला सल्ला देण्याऐवजी स्वत:चं तोंड बंद ठेवा,' अशी टीका निरुपम यांनी केली आहे.



काय म्हणाले होते संजय राऊत?
बिहारचे सर्व निकाल अजून समोर आलेले नाहीत. रात्री १०-११ पर्यंत निकाल स्पष्ट होईल. पण नितीशकुमार हे तिसऱ्या नंबरवर आहेत.  मुख्यमंत्रिपदी तीन वेळा राहूनही त्यांचा पक्ष तिसऱ्या क्रमांकावर जात असेल तर त्यांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे, असा चिमटा राऊत यांनी काढला.

फासा पलटला! भाजपाला राजदने टाकले मागे; 14 जागांचाच निकाल हाती

मतमोजणी प्रक्रिया खूप हळू चालली आहे. पण जर काँग्रेसला चांगली कामगिरी करता आली असती तर आतापर्यंत तेजस्वी मुख्यमंत्री झाले असते, असंही राऊत म्हणाले.

काँग्रेसची मोठी घसरण
गेल्या विधानसभा निवडणुकीत ४० जागा लढवणाऱ्या काँग्रेसनं २७ जागा जिंकल्या होत्या. यंदा काँग्रेसनं ७० जागांवर निवडणूक लढवली. मात्र यंदा काँग्रेसची कामगिरी चांगली झालेली नाही. सध्या काँग्रेसचे ७ उमेदवार विजयी झाले आहेत. तर १३ मतदारसंघांत त्यांच्याकडे आघाडी आहे.

Web Title: Bihar Assembly Election Results congress leader sanjay nirupam slams shiv sena mp sanjay raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.