शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
2
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
3
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
4
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
5
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
7
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
8
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
9
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
10
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
11
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
12
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
13
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
14
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
15
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
16
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
18
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
19
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
20
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत

बिहारमध्ये काँग्रेस महाआघाडीसाठी बेडी ठरली, आरजेडीच्या ज्येष्ठ नेत्याने केला आरोप

By बाळकृष्ण परब | Published: November 15, 2020 10:53 PM

Bihar Assembly Election 2020 News : विधानसभा निवडणुकीतील पराभवामुळे महाआघाडीमधील घटक पक्षांमध्ये सध्या निराशेचे वातावरण आहेत. त्यातच आता बिहारमधील निवडणुकीत सुमार कामगिरी करणाऱ्या काँग्रेसवर आरजेडीने जोरदार टीका केली आहे.

ठळक मुद्देबिहारमधील विधानसभा निवडणुकीत काँग्रेस ही महाआघा़डीसाठी बेडी बनली अशी टीका आरजेडीचे ज्येष्ठ नेते शिवानंद तिवारी यांनी केली काँग्रेसने या निवडणुकीसाठी ७० उमेदवार उतरवले होते. मात्र या ७० उमेदवारांसाठी ७० सभा काँग्रेसला घेता आल्या नाहीतराहुल गांधी प्रचारासाठी तीन दिवस आले. प्रियंका गांधी आल्याच नाहीत. ही बाब योग्य नव्हती

पाटणा - बिहार विधानसभा निवडणुकीत चांगली कामगिरी करूनही महाआघाडीला पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे महाआघाडीमधील घटक पक्षांमध्ये सध्या निराशेचे वातावरण आहेत. त्यातच आता बिहारमधील निवडणुकीत सुमार कामगिरी करणाऱ्या काँग्रेसवर आरजेडीने जोरदार टीका केली आहे. बिहारमधील विधानसभा निवडणुकीत काँग्रेस ही महाआघा़डीसाठी पायातील बेडी बनली अशी टीका आरजेडीचे ज्येष्ठ नेते शिवानंद तिवारी यांनी केली आहे.शिवानंद तिवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, महाआघाडीसाठी काँग्रेस ही  बेडी बनली आहे. काँग्रेसने या निवडणुकीसाठी ७० उमेदवार उतरवले होते. मात्र या ७० उमेदवारांसाठी ७० सभा काँग्रेसला घेता आल्या नाहीत .राहुल गांधी प्रचारासाठी तीन दिवस आले. प्रियंका गांधी आल्याच नाहीत. ही बाब योग्य नव्हती.

शिवानंद तिवारी म्हणाले की, माझ्या मते ही बाब केवळ बिहारपुरती मर्यादित नाही. इतर राज्यांमध्ये सुद्धा अधिकाधिक जागांवर लढण्याचा काँग्रेसचा आग्रह असतो. मात्र अधिकाधिक जागा जिंकण्यात ते अपयशी ठरतात. आता काँग्रेसने त्याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला.

यावेळी राहुल गांधी यांच्या एकंदरीत मानसिकतेवरही शिवानंद तिवारी यांनी जोरदार टीका केली. ते म्हणाले की, बिहार विधानसभेची निवडणूक ऐन रंगात आली असताना राहुल गांधी प्रियंका गांधी यांच्या सिमलामधील निवासस्थानी सहलीसाठी गेले होते. अशाप्रकारे पक्ष चालतो का? सध्या ज्या प्रकारे काँग्रेस चालवली जात आहे त्याचा फायदा भाजपाला होत आहे, असा आरोपही तिवारी यांनी केला.  

नुकत्याच झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीएने १२५ जागा जिंकत विजय मिळवला. तर तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडीला ११० जागांवर समाधान मानावे लागले. आता महाआघाडीला आलेल्या अपयशामध्ये काँग्रेसची निराशाजनक कामगिरी ही महत्त्वाचे कारण असल्याचे सांगण्यात येत आहे. या निवडणुकीत लढवलेल्या एकूण ७० जागांपैकी केवळ १९ जागांवरच काँग्रेसला विजय मिळवता आला होता.

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकRashtriya Janata Dalराष्ट्रीय जनता दलcongressकाँग्रेसPoliticsराजकारणRahul Gandhiराहुल गांधी