शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
2
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
3
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
4
TATA IPL Auction 2025 Live: भारतीय खेळाडूंचा लिलावात बोलबाला; पंत, अय्यर अन् चहल यांच्यावर पैशांचा पाऊस
5
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
6
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
7
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
8
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
9
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
10
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
11
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
12
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम
13
संभलमध्ये मशिदीच्या सर्व्हेदरम्यान हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, २ जणांचा मृत्यू 
14
"संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
15
भयंकर! इन्स्टावर मैत्री, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी ५ वर्षांच्या लेकीचा काढला काटा अन्...
16
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड
17
३३०० कोटींची संपत्ती… भाजपच्या सर्वात श्रीमंत उमेदवाराचा निकाल काय लागला?
18
अखेर अनिरुद्ध-संजनाला घराबाहेर काढणार अरुंधती! 'आई कुठे काय करते'च्या अंतिम भागाचा प्रोमो रिलीज
19
महाराष्ट्राच्या निकालाचा भविष्यातील राष्ट्रीय राजकारणावर परिणाम, 'या' 5 पॉइंटमधून समजून घ्या...

Bihar Election 2020: आज लोकसभा, राज्यसभा मिळूनही काँग्रेसचे १०० खासदार नाहीत- पंतप्रधान मोदी

By कुणाल गवाणकर | Published: November 03, 2020 1:06 PM

Bihar Election 2020: लोकांना सदासर्वकाळ मूर्ख बनवता येत नाही; पंतप्रधान मोदींचा काँग्रेसला टोला

पाटणा: बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातलं मतदान सुरू आहे. आता निवडणुकीचा केवळ एकच टप्पा शिल्लक राहिल्यानं सर्वच राजकीय पक्षांनी प्रचारासाठी जोर लावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दोन सभांना संबोधित करणार आहेत. यापैकी अररियामधल्या फारबिसगंजमध्ये भाषण करताना मोदींनी राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसचा समाचार घेतला. लोकांना सदासर्वकाळ मूर्ख बनवता येत नाही. काँग्रेसच्या सध्यस्थितीवरून हेच दिसतंय, अशा शब्दांत मोदींनी विरोधकांवर हल्लाबोल केला.पंतप्रधान मोदींनी राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींवर निशाणा साधला. 'बिहारच्या जनतेनं डबल युवराजांना नाकारत पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास दाखवला आहे. त्यामुळे राज्यात एनडीएचं सरकार येणार हे निश्चित आहे,' असं मोदी म्हणाले. 'आज संपूर्ण जगाला बिहारनं संदेश दिला आहे. जगभरात कोरोनाचा कहर सुरू असताना बिहारी जनता उत्साहानं मतदानासाठी घराबाहेर पडली आहे. दुसऱ्या टप्प्यात सध्या बंपर मतदान सुरू आहे,' असं पंतप्रधान म्हणाले. कोरोना संकटात निवडणूक घेणाऱ्या निवडणूक आयोगाचेही मोदींनी आभार मानले.'डबल युवराजां'वरून मोदींचा निशाणाबिहारमध्ये एनडीएचंच सरकार येणार हा संदेश राज्यातल्या जनतेनं पहिल्याच टप्प्यातल्या मतदानातून दिला आहे. बिहारी जनतेनं डबल युवराज आणि जंगलराजला स्पष्टपणे नाकारलं आहे. एनडीएच्या विरोधात उभ्या ठाकलेल्यांनी सत्तेत असताना प्रचंड खाबुगिरी केली. आता पुन्हा ते बिहारकडे स्वार्थीपणे पाहत आहेत. पण राज्याचा विकास कोण करणार, याची बिहारी जनतेला अगदी व्यवस्थितपणे कल्पना आहे, अशा शब्दांत मोदींनी राजद-काँग्रेसवर हल्ला चढवला.काँग्रेसवर मोदींचं टीकास्त्रकाँग्रेसनं देशाला खोटी स्वप्नं दाखवली. गरिबी हटवू, शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू, वन रँक वन पेंशन लागू करू, अशी आश्वासनं काँग्रेसनं दिली. मात्र त्यातलं एकही आश्वासन पूर्ण केलं नाही. लोकांना सदासर्वकाळ मूर्ख बनवता येत नाही. त्यामुळेच आज काँग्रेसची अवस्था वाईट आहे. लोकसभा, राज्यसभेतली सदस्यांची संख्या एकत्र करूनही त्यांचे १०० खासदार होत नाहीत. अनेक राज्यांत तर त्यांना भोपळाही फोडता आलेला नाही. उत्तर प्रदेश-बिहारमध्ये तर ते चौथ्या-पाचव्या क्रमांकावर आहेत. त्यामुळेच कोणाची तरी मदत घेऊन ते अस्तित्व टिकवू पाहत आहेत, अशा शब्दांत मोदींनी काँग्रेसवर घणाघात केला.

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसTejashwi Yadavतेजस्वी यादवRashtriya Janata Dalराष्ट्रीय जनता दल