शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

Bihar Election 2020: ‘जीडीएसएफ’च्या माध्यमातून ‘वंचित’चा प्रयोग; बिहारमध्ये दलित व मुस्लिम मतांचे राजकारण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2020 1:45 AM

पाच पक्षांनी एकत्र येत बनवला फ्रंट, नव्याने आकारास आलेल्या ग्रँड डेमोक्रेटिक सेक्युलर फ्रंटची जनता दल (स) आणि राष्ट्रीय जनता दल यांना जास्त काळजी लागली आहे.

असीफ कुरणे 

कोल्हापूर : बिहारच्या राजकारणात दलित, महादलित व मुस्लिम मतांना फार महत्त्व असून, या मतांच्या बळावरच एमआयएम, बसपा आणि आरएलएसपीसारख्या पक्षांनी एकत्र येत नवी आघाडी उघडली आहे. या पक्षांनी निवडणुकीसाठी ग्रँड डेमोक्रेटिक सेक्युलर फ्रंट (जीडीएसएफ) नावाची आघाडी स्थापन करीत मैदानात आव्हान उभे केले आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात झालेल्या वंचित बहुजन आघाडीसारखा हा प्रयोग ठरू शकतो. या फ्रंटने सत्ताधाऱ्यांसह विरोधी गटात चिंता वाढवली असून, याचा नेमका फटका कोणाला बसणार, हे निकालानंतरच कळेल.

बिहारमधील दलित आणि मुस्लिम मते एकगठ्ठा खेचण्यासाठी मायावती (बहुजन समाज पार्टी) खासदार असदोद्दीन ओवेसी (एमआयएम), उपेंद्रसिंह कुशवाह (राष्ट्रीय लोक समता पार्टी) यांनी जनतांत्रिक पार्टी, समाजवादी जनता दलसह ग्रँड डेमोक्रेटिक सेक्युलर फ्रंट तयार केला आहे. लोकसभा निवडणुकीवेळी महाराष्ट्रात असदोद्दीन ओवेसी आणि अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग करीत अनेकांची गणिते बिघडवली होती. जवळपास १३ लोकसभा जागांवर वंचितच्या उमेदवारांनी दखलपात्र मते घेतली होती. अशाच पद्धतीने बिहारमध्ये दलित, मुस्लिम मते एकत्र करीत त्यांना प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न सुरू आहे. बिहारमध्ये जवळपास १६ टक्के दलित मते, तर १७ टक्के मुस्लिम मते आहेत, तर १४ टक्के यादव मते आहेत. याच दलित, मुस्लिम मतांवर जीडीएसएफचा डोळा आहे. २०१५ च्या निवडणुकीतदेखील एमआयएमने मुस्लिम मतांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला होता; पण त्यांना बिहारी मतदारांनी नाकारले होते. मात्र, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत बिहारमधील एमआयएमच्या उमेदवारांनी लक्षणीय मते घेतली होती. बसपाचा बिहारमध्ये फारसा मतदार नाही; पण उत्तर प्रदेशाला लागून असलेल्या मतदारासंघामधील दलित मतदारांवर मायावतींचा प्रभाव दिसतो.सत्ताधारी, विरोधकांना धाकधूकनव्याने आकारास आलेल्या ग्रँड डेमोक्रेटिक सेक्युलर फ्रंटची जनता दल (स) आणि राष्ट्रीय जनता दल यांना जास्त काळजी लागली आहे. कारण दलित समाजातील अनेक जाती या नितीश कुमार यांच्या पाठीशी उभे राहत असल्याचे मागील निकालातून दिसले आहे, तर राष्ट्रीय जनता दलाला मुस्लिम मतदार पसंती दर्शवतात. जीडीएसएफच्या उमेदवारांना दलित, मुस्लिम मतदाराने साथ दिली, तर सत्ताधारी व विरोधकांना थेट फटका बसण्याचा धोका आहे. त्यामुळेच जीडीएसएफचे उमेदवार किती आणि कोणाची मते खातात, यावर सत्तेचा तराजू कोणाकडे झुकणार हे दिसेल.

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकmayawatiमायावतीAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन