पाटणा - बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आता दोन महिने उलटले आहेत. या निवडणुकीत एनडीएने काठावरचे बहुमत मिळवत नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन केले असले तरी सुरुवातीपासूनच हे सरकार अस्थिरतेच्या हिंदोळ्यावर झोके घेत आहे. दरम्यान, जेडीयूच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत अनेक नेत्यांना पक्षाच्या खराब कामगिरीचे खापर भाजपाच्या माथी मारल्यानंतर आता एनडीएमधील अजून एक घटक पक्ष असलेल्या हिंदुस्थानी अवाम मोर्चा (हम)चे नेते जीतनराम मांझी यांनी भाजपाला लक्ष्य केले आहे.मांझी यांनी भाजपाचे नाव न घेता टोले लगावले आणि कारस्थान करणारा पक्ष असा भाजपाचा उल्लेख केला. भाजपाचे नाव न घेता मांझी म्हणाले की, नितीश कुमार यांच्याविरोधात निवडणुकीमध्ये कारस्थान रचले गेले. नितीश कुमार यांनी त्यांचे सरकार बिहारमध्ये पाच वर्षांची कारकीर्द पूर्ण करेल, असे ट्विट केले होते. त्यानंतर मांझी यांनी नितीश कुमार यांचे ट्विटरवरून कौतुक केले. तसेच त्यांना आघाडीधर्म पाळणे चांगल्या पद्धतीने येते, असे सांगितले.मांझी म्हणाले की, एनडीएमधील घटक पक्षाचा अंतर्विरोध आणि कारस्थानांनंतरही त्यांना सहकार्य करणे नितीश कुमार यांच्या महानतेला अधोरेखित करते. ते म्हणाले की, राजकारणामध्ये आघाडीधर्माचे पालन करणे जर शिकायचे असेल तर ते नितीश कुमार यांच्याकडून शिकता येईल.मांझी शेवटी लिहितात की, नितीश कुमार यांच्या धैर्याला मांझीचा सलाम. बिहार एनडीएमध्ये असंतोष खदखदत असल्याच्या पार्श्वभूमीवर जीतनराम मांझीसुद्धा चर्चेत होते. मांझी हे मंत्रिमंडळात एका जागेसह एमएलसीच्या एका जागेसाठी दबाव बनवत असल्याची चर्चा आहे.
बिहार एनडीएमध्ये खदखद, जेडीयूनंतर अजून एका मित्रपक्षाने भाजपावर साधला निशाणा
By बाळकृष्ण परब | Published: January 10, 2021 8:48 PM
Bihar Political News : निवडणुकीत एनडीएने काठावरचे बहुमत मिळवत नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन केले असले तरी सुरुवातीपासूनच हे सरकार अस्थिरतेच्या हिंदोळ्यावर झोके घेत आहे
ठळक मुद्देजेडीयूनंतर हिंदुस्थानी अवाम मोर्चा (हम)चे नेते जीतनराम मांझी यांनी भाजपाला लक्ष्य केले आहेमांझी यांनी भाजपाचे नाव न घेता टोले लगावले आणि कारस्थान करणारा पक्ष असा भाजपाचा उल्लेख केलानितीश कुमार यांच्याविरोधात निवडणुकीमध्ये कारस्थान रचले गेले