पाटणा: दरवर्षीप्रमाणे यंदाही बिहारमध्ये पूरस्थिती बिकट आणि भयावह बनली आहे. अनेकांना याचा फटका बसलाय. मात्र, अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कॅबिनेटमध्ये सहभागी झालेले केंद्रीय खाद्य आणि प्रक्रिया उद्योग मंत्री पशुपती कुमार पारस यांनी अजब तर्कट केले असून, पूर येणे हा देवाचा कोप आहे, असे सांगत पूरग्रस्त भागातील पीडितांना भेटायला जाण्यास त्यांनी चक्क नकार दिला. (bihar pashupati paras says he will not meet people suffering from floods)
अटकेनंतर नारायण राणेंची पहिली प्रतिक्रिया; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा उल्लेख करत म्हणाले...
केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी झाल्यानंतर पशुपती कुमार पारस प्रथमच बिहारमध्ये गेले होते. आपला संसदीय मतदारसंघ हाजीपूर येथे पत्रकारांशी संवाद साधताना पारस म्हणाले की, पूर येणे हा देवाचा प्रकोप आहे. देशाच्या अनेक भागांमध्ये पूर येतात. एवढेच नव्हे, तर प्रत्येक वर्षी बिहारमध्ये पूर येतो. पूरग्रस्तांना भेटायला गेले पाहिजे, असे मला वाटत नाही, असे पारस यांनी म्हटले आहे.
नेपाळशी चर्चा करणे महत्त्वाचे
बिहारमध्ये येणाऱ्या पूराचे मुख्य कारण नेपाळ आहे. बिहारमधील पूरस्थिती नियंत्रणात आणायची असेल, तर नेपाळशी चर्चा करायला हवी. तसेच प्रत्येक वर्षी पूराचा सामना बिहारला करावा लागत असल्याने पीडितांना हरसंभव मदत करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत, असे पारस यांनी स्पष्ट केले.
“१४ महिने मंत्रालयात न येणारा मुख्यमंत्री उत्कृष्ट कसा काय?”; भाजपची विचारणा
दरम्यान, पुतण्या चिराग पासवान याच्याशी मोठे राजकीय मतभेद झाल्यानंतर बिहामधील राजकीय वातावरण तापले होते. यानंतर लोक जनशक्ती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून पारस यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. चिराग पासवान हे राम विलास पासवान यांच्या संपत्तीचे वारस असू शकतात. मात्र, त्याचा उत्तराधिकारी मीच आहे, असे पारस यांनी म्हटले होते. या घडामोडींनंतर पारस यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देत भाजपने घटक पक्षाला खुष ठेवण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जाते.