Tej Pratap Yadav: लालूप्रसाद यादव यांना मोठा धक्का; मुलगा तेजप्रताप काँग्रेसमध्ये जाणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2021 05:29 AM2021-10-08T05:29:00+5:302021-10-08T05:29:46+5:30
तेजप्रताप राष्ट्रीय जनता दलात नाहीत. त्यांना निलंबित करण्यात आले आहे, असे उद्गार पक्षाचे राष्ट्रीय सचिव शिवानंद तिवारी यांनी काढले
एस.पी. सिन्हा
पाटणा : लालूप्रसाद यादव यांचे मोठे पुत्र तेजप्रताप व छोटे चिरंजीव तेजस्वी यांच्यात जमेनासे झाले आहे. त्यामुळे तेजप्रताप राष्ट्रीय जनता दल सोडून काँग्रेसमध्ये जातील, अशी चर्चा आहे. स्वत: तेजप्रताप गप्प आहेत आणि त्यांच्या समर्थकांनी तशी शक्यता फेटाळून लावली आहे. पण, तेजप्रताप काँग्रेस नेत्यांच्या संपर्कात आहे.
तेजप्रताप राष्ट्रीय जनता दलात नाहीत. त्यांना निलंबित करण्यात आले आहे, असे उद्गार पक्षाचे राष्ट्रीय सचिव शिवानंद तिवारी यांनी काढले. त्यानंतर लगेचच काँग्रेसचे वरिष्ठ नेते अशोक राम यांनी तेजप्रताप यांची भेट घेतली. राज्यात काँग्रेस व राजद यांची महाआघाडी असूनही कुशेश्वरस्थान मतदारसंघातून काँग्रेसने राजदविरोधात उमेदवार दिला आहे. तिथे काँग्रेसला तेजप्रताप यांचा पाठिंबा दिसत आहे.