शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
4
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
5
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
6
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
7
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
8
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
10
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
11
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
12
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
13
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
14
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
15
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
16
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
17
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
18
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
19
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?

"बिहार काँग्रेसमध्ये मोठी फूट पडणार, निम्याहून अधिक आमदार पक्ष सोडणार", काँग्रेस नेत्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2021 11:20 AM

bihar politics : काँग्रेसच्या हायकंमाडने भरत सिंह यांचा दावा फेटाळून लावला आहे.

ठळक मुद्दे काँग्रेस विधीमंडळाचे नेते अजित शर्मा सुद्धा अशा लोकांमध्ये सामील आहेत, जे पक्षात फूट पाडू पाहत आहेत, असे काँग्रेस नेते भरत सिंह यांनी म्हटले आहे.

पटना : बिहारच्याराजकारणात नवा भूकंप आला आहे. जवळपास ११ काँग्रेसचे आमदार पक्ष सोडणार असल्याचा दावा, येथील काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार भरत सिंह यांनी केला आहे. पक्षामध्ये लवकरच मोठी फूट पडणार असून ११ आमदार पक्ष सोडणार आहे, असे भरत सिंह यांनी म्हटले आहे. मात्र, काँग्रेसच्या हायकंमाडने भरत सिंह यांचा दावा फेटाळून लावला आहे.

१९ आमदारांपैकी ११ आमदार असे आहेत की, जे काँग्रेस पक्षाचे नाहीत. मात्र, निवडणुका जिंकल्या आहेत. या लोकांनी पैसे देऊन तिकीट खरेदी केले आणि आता आमदार बनले आहेत. संख्याबळाने स्वत:ला मजबूत करण्यासाठी एनडीएमध्ये जाण्यासाठी प्रयत्न करीत आहे. काँग्रेस विधीमंडळाचे नेते अजित शर्मा सुद्धा अशा लोकांमध्ये सामील आहेत, जे पक्षात फूट पाडू पाहत आहेत, असे काँग्रेस नेते भरत सिंह यांनी म्हटले आहे.

याचबरोबर, जे ११ काँग्रेस आमदार पक्ष सोडणार आहेत. त्यांचे मार्गदर्शक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मदन मोहन झा, राज्यसभा खासदार अखिलेश प्रसाद सिंह आणि वरिष्ठ काँग्रेस नेते सदानंद सिंह हे आहेत.  राज्यपाल नियुक्त आमदारांचे नामाकंन अद्याप बाकी आहे. त्यामुळे सदानंद सिंह आणि मदन मोहन झा हे राज्यपाल कोठ्यातून आमदार होण्याच्या तयारीत आहेत, असा आरोप भरत सिंह यांनी केला. तसेच, सुरुवातीपासूनच काँग्रेसच्या आरजेडीसोबत असलेल्या महाआघाडीला विरोध केला आहे. अनेक वर्षांपासून मी आरजेडीसोबतच्या महाआघाडीचा विरोध केला आहे, असे भरत सिंह म्हणाले. 

दरम्यान, याआधी बिहारच्या प्रभारी पदाच्या जबाबदारीतून मुक्त करावे, अशी विनंती बिहारमधील काँग्रेसचे प्रभारी शक्ती सिंह गोहिल यांनी काँग्रेसच्या हायकमांडकडे केली होती. यानंतर काँग्रेस हायकमांडने शक्ती सिंग गोहिल यांना बिहारच्या प्रभारी पदाच्या जबाबदारीतून मुक्त केले होते.पक्षाने जारी केलेल्या पत्रानुसार, भक्तम चरण दास यांना शक्ती सिंह गोहिल जागी बिहारचे काँग्रेस प्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. 

टॅग्स :congressकाँग्रेसPoliticsराजकारणBiharबिहार