मुंबई: गेला आठवडाभर वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या तुफान पावसामुळे मुंबई, कोकणासह सांगली, कोल्हापूर यांसारख्या अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली होती. अनेक ठिकाणी दरडी कोसळून झालेल्या दुर्घटनेत शेकडो जणांचा मृत्यू झाला. लाखो नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक राजकीय नेतेमंडळींनी पूरग्रस्त भागांना भेटी दिल्या. चिपळूणमधील परिस्थितीची पाहणी करताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यापारी आणि ग्रामस्थांशीही संवाद साधला. यावेळी भास्कर जाधव यांचा महिलेशी अरेरावी करतानाचा एक व्हिडीओ समोर आल्यानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. भास्कर जाधवांचे गैरवर्तन म्हणजे मालकाला खूश करण्याचा प्रकार, असल्याची बोचरी टीका भाजपकडून करण्यात आली आहे. (bjp ashish shelar slams shiv sena bhaskar jadhav over chiplun incident video)
चिपळूणमध्ये मदतीची विनवणी करणाऱ्या एका महिलेल्या भास्कर जाधव यांनी दिलेल्या उत्तरावरून वाद निर्माण झाला असून, भास्कर जाधव यांची बोलण्याची पद्धत चुकल्याचे सांगत सोशल मीडियावर अनेक तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. यावरून भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर आता भाजप आमदार आशिष शेलार यांनी निशाणा साधला आहे. ते मीडियाशी बोलत होते.
“भास्कर जाधव यांचे वर्तन योग्य नाही”; देवेंद्र फडणवीसांनी चांगलेच सुनावले
भास्कर जाधवांचा गैरवर्तनाचा जाहीर कार्यक्रम
भास्कर जाधव यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेतच गैरवर्तन केले होते. विधानसभा अध्यक्षांच्या कक्षात गैरवर्तन केले होते. त्या गैरवर्तनाचा जाहीर कार्यक्रम त्यांनी जनतेसमोर ठेवला. हे होणारच होते. ज्यांना जनतेच्या नाळेपेक्षा स्वःपक्षाची नाळ मोठी वाटते. आपल्या मालकाला खुश करण्यासाठी जनतेला लाथ मारावी असे वाटते. तेच लोक भास्कर जाधव सारखं करतात, या शब्दांत आशिष शेलार यांनी टीकास्त्र सोडले आहे.
“हिंदुत्ववादी भूमिका महत्त्वाची; मनसे शत्रूपक्ष नाही, पण...”; युतीबाबत फडणवीसांचे सूचक विधान
अनेक वर्ष उलटूनही परिस्थिती काही बदलली नाही
२६ जुलै हा दुर्दैवाने मुंबईकरांच्या कायमचा लक्षात राहणारा दिवस आहे. अनेक वर्ष उलटूनही परिस्थिती काही बदलली नाही. इतकी वर्ष सत्तेत राहून शिवसेनेने मुंबईकरांशी फितुरी केली आहे. कोकण आणि साताऱ्यातील परिस्थिती पाहतोय. चिखलाचे डोंगर, मृत्यूचे थैमान हे पाहून मुंबईत शिवसेनेला काहीतरी करावे, असे वाटते नाही. कोट्यवधींच्या प्रोजेक्टच्या नावाखाली १६ वर्षात ३ लाख २० हजार कोटीचा खर्च मुंबईकरांसाठी केला. मात्र खर्च करून चित्र काय, तर तेच. मग हे पैसे गेले कुठे? सत्ताधारी शिवसेनेला याची उत्तरे द्यावी लागतील, असे शेलार म्हणाले.
“पूरग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करू नये”; नारायण राणेंवर काँग्रेसचे टीकास्त्र
भास्कर जाधव यांचे वर्तन योग्य नाही
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात महापूर आला आहे. यामुळे जनतेचा आक्रोश पाहायला मिळतो. मात्र, त्यासाठी अंगावर जाणे योग्य नाही. भास्कर जाधव यांनी केलेले वर्तन योग्य नाही. या घटनेची दखल घेतली गेली पाहिजे. वर्षभरातील तीन मोठ्या घटनेमुळे कोकणवासीय उद्ध्वस्त झाले आहेत. यासाठी आता आऊट ऑफ द बॉक्स जाऊन विचार करायला हवा. कोल्हापूर आणि सांगलीतील महापुरावेळी जीआर बदलून मदत केली होती. तशीच मदत आता करायला हवी, असे देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले.