मुंबई: उत्तर प्रदेशात मोठ्या प्रमाणात सुरु असलेल्या धर्मांतर करणाऱ्या रॅकेटवर कारवाई झाल्यानंतर आता याच्या तपासातून रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश पोलिसांच्या एटीएस पथकाने सोमवारी बीड जिल्ह्यातील मन्नू यादव, अब्दुल इरफान शेख आणि राहुल भोला यांना अटक केली. यावरून आता भाजपने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. (bjp atul bhatkhalkar criticized cm uddhav thackeray over religion conversion racket)
उत्तर प्रदेशात धर्मांतरण रॅकेटसाठी ७ पद्धतीचे कोड वापरण्यात येत होते. हे सर्व कोड डिकोड करून त्याचा अर्थ उलगडला आहे. देशभरात केल्या जात असलेल्या धर्मांतर रॅकेटचा हे दोघे भाग असल्याचा दावा उत्तर प्रदेश पोलिसांनी केला होता. या रॅकेटचे धागेदोरे राज्यातील बीड जिल्ह्यापर्यंत पोहोचले आहेत. यावरून भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
यंदाच्या गणेशोत्सवासाठी राज्य सरकारकडून मार्गदर्शक सूचना जाहीर; पाहा, नियमावली
जनाब मुख्यमंत्र्यांना हे झेपेल का?
उत्तर प्रदेशातील धर्मांतराच्या षडयंत्रात सहभागी असल्याच्या आरोपावरून उत्तर प्रदेश पोलिसांनी बीडच्या एका युवकाला अटक केली आहे. त्याचे लागेबांधे निश्चितच महाराष्ट्रात खोलवर पसरलेले असणार. ठाकरे सरकारने ही पाळेमुळे खणून काढावीत. जनाब मुख्यमंत्र्यांना हे झेपेल का?, असा सवाल अतुल भातखळकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून केला आहे.
सुटकेसाठी संघटना सरसावल्या
उमर गौतम आणि जहाँगीर यांच्या अटकेनंतर त्यांच्या सुटकेसाठी नवी दिल्लीतील स्टूडेंट इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया यांनी पुढे येऊन त्यांना सोडण्याची मागणी केली आहे. राज्य सरकार त्यांच्या राजकीय फायद्यासाठी समाजात द्वेष पसरवण्याचं काम करतंय त्यात मिडियाचा एक मोठा गटही काम करतोय असा आरोप या संघटनेने केला.
“अनिल देशमुखांना ईडी कार्यालयात जायचं म्हटलं की वय, आजार आठवायला लागलं”
दरम्यान, उत्तर प्रदेश पोलिसांच्या एटीएसने मूळ दिल्लीतील रहिवाशी असणाऱ्या मुफ्ती काझी जहांगीर कासमी आणि मोहम्मद उमर गौतम यांना अटक केली होती. मूकबधिर मुले आणि महिलांचे धर्मांतर केल्यांच्या घटनांमध्ये त्यांचा सहभाग असून, १ हजारांपेक्षा जास्त लोकांचे त्यांनी धर्मांतर केले असल्याचे उत्तर प्रदेश पोलिसांनी म्हटले होते.