मुंबई: संपूर्ण जगभरात जागतिक योग दिवस साजरा केला जात आहे. योगाचे महत्त्व, प्रसार आणि प्रचार यासाठी योग दिवस मोठ्या प्रमाणात तसेच उत्साहात साजरा केला जातो. मात्र, योग दिनाच्या दिवशीही राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टीकेवर भाजपने पलटवार केला असून, कार्यक्षमता निर्माण करणारे एखादे आसन मुख्यमंत्र्यांना सूचवा, असा टोला लगावला आहे. (bjp atul bhatkhalkar replied shiv sena sanjay raut over his statement on yoga)
शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजपवर टीका करत, भाजपने शवासन करावे, असा टोला लगावला. या टीकेला भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी प्रत्युत्तर दिले असून, ट्विटरच्या माध्यमातून संजय राऊत आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
“उपाशी, बेरोजगाराला योग करायला लावणं अत्यंत क्रूरपणाचं”; माजी न्यायमूर्तींचे ताशेरे
एखादे आसन मुख्यमंत्र्यांना सूचवा
मुख्यमंत्र्यांच्या घरबशा कारभारामुळे महाराष्ट्रातली स्मशाने अखंड धगधगतायत, मेंदू तल्लख करणारे आणि कार्यक्षमता निर्माण करणारे एखादे आसन त्यांना सुचवा. अर्थात घरी बसून करता येईल असे, अशी टीका भातखळकर यांनी केली आहे.
यश मिळेल असं वाटत नाही
संजय राऊत यांना पत्रकारांनी शिवसेना नेत्यांवर दबाव टाकून सत्तास्थापनेसाठी भाग पाडण्याचा प्रयत्न आहे का, असा प्रश्न विचारला. यावर, त्याला यश मिळेल असं वाटत नाही. आम्ही वाघाच्या काळजाची माणसं आहोत. आमचं शरीर वाघाचं आणि काळीज उंदराचं यात मोडत नाही. आम्ही कोणत्याही प्रसंगाला तोंड देणारे बाळासाहेबांचे शिलेदार आहोत. आम्हाला सर्व माहिती असून फार तर तुरुंगात टाकाल. तुरुंगात जाण्याची आमची तयारी आहे, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांनीही केंद्रातील मोदी सरकावर योग दिनाच्या दिवशी ताशेरे ओढले आहेत. लोकांची पोटं रिकामी आहेत आणि त्यांना योग करायला लावतायत... खिसे रिकामे आहेत आणि बँकेत खाते उघडायला सांगतायत... डोक्यावर छप्पर नाही आणि शौचालये बनवली जातायत... खरंच देश बदलतोय, अशी टीका काटजू यांनी मोदी सरकारवर केली.