शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
4
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
5
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
6
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
7
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
8
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
10
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
11
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
12
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
13
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
14
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
15
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
16
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
17
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
18
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
19
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
20
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'

“नाना पटोलेंना मुख्यमंत्री, राहुल गांधींना वाटतंय पंतप्रधान व्हावसं, पण...”; भाजपचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2021 6:38 PM

स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुका स्वबळावर लढवण्याची घोषणा नुकतीच काँग्रेस पक्षाकडून करण्यात आली आहे. यावरून आता भाजपने काँग्रेसला टोला लगावला आहे.

मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून राज्य सरकार आणि विरोधक अनेकविध मुद्द्यांवरून एकमेकांसमोर ठाकल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. एकीकडे कोरोना संकट अद्यापही कायम असताना दुसरीकडे निवडणुका आणि राजकारण यांवरून पक्षांमध्ये कलगीतुरा रंगताना दिसत आहे. यातच स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुका स्वबळावर लढवण्याची घोषणा नुकतीच काँग्रेस पक्षाकडून करण्यात आली आहे. यावरून आता भाजपने काँग्रेसला टोला लगावला आहे.  (bjp atul bhatkhalkar slams congress and nana patole over assembly election declaration)

नाना पटोले यांनी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे घोषित केले होते. त्यानंतर आता अन्य पक्षांकडूनही भूमिका मांडल्या जात असून, संमिश्र प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. यातच आता भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी नाना पटोले आणि राहुल गांधी यांना टोला लगावला आहे. 

“... तरच फायदा होईल, मोर्चा काढून निष्पन्न काय होणार”: अशोक चव्हाण

जनतेला असं अजिबातच वाटत नाही

नाना पटोलेंना मुख्यमंत्री व्हावसं वाटतंय… राहुलजींनाही वाटतंय पंतप्रधान व्हावसं… जनतेला असं अजिबातच वाटत नाही. भविष्यात वाटण्याची शक्यताही नाही हाच दोघांचा प्रॉब्लेम आहे, या शब्दांत अतुल भातखळकर यांनी ट्विटरवरून चिमटा काढला आहे. 

उगाच सत्तेवर येण्याची स्वप्न पाहू नका

यापूर्वी आणखी एक ट्विट करत अतुल भातखळकर यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली होती. सत्तेवर आल्यावर काँग्रेस कलम ३७० पुन्हा लागू करेल असा दावा वरीष्ठ काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी केला आहे. काँग्रेस सत्तेवर आल्यावर उरलेला काश्मीर पाकिस्तानला आणि लडाख चीनला देऊ शकतो, हे देशाच्या जनतेला पुरते कळून चुकले आहे म्हणून उगाच सत्तेवर येण्याची स्वप्न पाहू नका…, या शब्दांत भातखळकर यांनी काँग्रेसवर निशाणा साधला होता.

आता लहान समूह जगावर राज्य करू शकत नाहीत; चीनने दिला इशारा

दरम्यान, भाजप हा कायम आमचा विरोधी पक्ष आहे. शरद पवार भाजपाविरोधात मोट बांधत असतील, तर चांगली गोष्ट आहे. मात्र, महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार आहे. भाजपमध्ये गेलेले नेते पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यास इच्छुक आहेत. काँग्रेसमध्ये येणाऱ्यांची आपल्याकडे मोठी यादी आहे, पण आता सर्वसामान्य कार्यकर्त्याला आमदार बनवले जाईल, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :PoliticsराजकारणBJPभाजपाAtul Bhatkalkarअतुल भातखळकरRahul Gandhiराहुल गांधीNana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेस