शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

भाजपाने डाव्यांचा गड फोडला; थिरुवनंतपुरममध्ये महापौरपदाचा उमेदवार पाडला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2020 3:23 PM

Kerala Local Body Election Result News: केरळमध्ये आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा निकाल आहे. यामध्ये सत्ताधारी सीपीएमच्या नेतृत्वातील एलडीएफ आघाडीवर असून यूडीएफ दुसऱ्या क्रमांकावर आहे.

बिहार, हैदराबादमध्ये भाजपाने मुसंडी मारत अनेकांच्या भुवया उंचावलेल्या असताना आता डाव्यांच्या भक्कम गडामधील अनेकवर्षांपासूनची कोंडी फोडली आहे. केरळमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दोन पालिका भाजपाच्या ताब्यात जाण्याची शक्यता आहे. 

केरळमध्ये आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा निकाल आहे. यामध्ये सत्ताधारी सीपीएमच्या नेतृत्वातील एलडीएफ आघाडीवर असून यूडीएफ दुसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र, भाजपाने गेल्या वेळच्या तुलनेत मोठी झेप घेतली असून चांगले प्रदर्शन केले आहे.  त्रिवेंद्रम आणि थिरुवनंतपुरममध्ये भाजपाने एलडीएफ आणि यूडीएफच्या तोंडचे पाणी पळविले आहे. 

केरळमध्ये ९४१ ग्राम पंचायतींमध्ये निवडणूक होती. यापैकी एलडीएफ 503 वर पुढे आहे. तर यूडीएफ 377 आणि भाजपा २४ ग्रामपंचायतींमध्ये आघाडीवर आहे. भाजपाकडून आमदारकीची निवडणूक लढलेल्या राजेश यांना या निवडणुकीत उतरवून भगवा दलाने मोठा डाव खेळला होता. राजेश नेडुमंगड मतदारसंघातून विधानसभा लढले होते. तेव्हा ते तिसऱ्या क्रमांकावर होते. 

एनडीएने महापौर पदाच्या उमेदवाराला पाडलेथिरुवनंतपुरम आणि कोझिकोड कार्पोरेशनमध्ये सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये भाजपा दुसऱ्या क्रमांकावर आहे. २०१५ मध्ये भाजपाने थिरुवनंतपुरममध्ये दोन्ही विरोधी पक्षांना हैरान करून सोडले होते. १०० सीटपैकी भाजपाला ३४ जागा मिळाल्या होत्या. यूडीएफ तिसऱ्या क्रमांकावर गेली होती. यावेळीही भाजपाने कडवी टक्कर दिली आहे. भाजपाच्या नेतृत्वातील एनडीएने डाव्यांचा महापौर पदाच्या उमेदवार एस पुष्पलता यांनाच पराभवाची धूळ चारली आहे. 

थिरुवनंतपुरम केरळमध्ये घुसण्याचा दरवाजालोकसंख्या आणि क्षेत्रफळाच्या हिशोबाने थिरुवनंतपुरम महापालिका निवडणूक भाजपासाठी खूप महत्वाची आहे.  भाजपासाठी केरळमध्ये घुसण्याचा हा दरवाजा आहे. १०० वॉर्ड चार विधानसभा मतदारसंघात विभागलेले आहेत. गेल्या निवडणुकीत भाजपाने चारपैकी एक जागा जिंकली होती. १५ वर्षांपासून माकपाचे येथे राज्य आहे. यामुळे महापौर पदाचा उमेदवार पाडल्याने भाजपाला महापौरपद मिळेल का याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष  लागले आहे. यानंतर पलक्कडमध्येही भाजपाने मोठी मुसंडी मारली आहे.  

टॅग्स :BJPभाजपाKeralaकेरळElectionनिवडणूक