जयपूर - जवळपास महिनाभर चाललेल्या राजकीय अनिश्चिततेनंतर पक्षश्रेष्ठींनी समजूत काढल्याने राजस्थानमधील राजकीय नाट्य संपुष्टात आले होते. मात्र राजस्थानमध्ये सारे आलबेल झाले असे वाटत असतानाच भाजपाने खेळलेल्या एका चालीमुळे राज्यातील राजकारणात नवा ट्विस्ट आला आहे. आज झालेल्या भाजपाच्या बैठकीमध्ये राज्यातील अशोक गहलोत यांच्या नेतृत्वाखालील सरकारविरोधात अविश्वास ठराव आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता उद्या होणाऱ्या विधानसभेच्या अधिवेशनात अशोक गहलोत यांना बहुमत सिद्ध करावे लागणार आहे.भाजपाचे राजस्थान विधानसभेतील नेते गुलाबचंद कटारिया यांनी सांगितले की, काँग्रेस टाके लावून कपडे शिवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र त्यांचे कापड फाटले आहे, आता सरकारही लवकरच कोसळेल. तर भाजपाचे राजस्थानमधील प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया म्हणाले की, हे सरकार आपसातील विरोधाभासामुळेच कोसळेल. हे लोक भाजपावर आरोप करत आहेत. पण यांच्या घरातील झगड्याशी भाजपाचे काहीही देणेघेणे नाही.भाजपाने आज राजस्थानमधील आमदारांची बैठक घेतली. यामध्ये माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजेसुद्धा सहभागी झाल्या होत्या. तसेच केंद्रीय नेतृत्वाकडून प्रतिनिधीने या बैठकीत उपस्थिती लावली होती.राज्यपालांच्या आदेशानंतर राजस्थान विधानसभेचे अधिवेश १४ ऑगस्टपासून सुरू होत आहे. मात्र या अधिवेशनात केवळ कोरोना संकट आणि लॉकडाऊन तसेच इतर मुद्द्यांवर चर्चा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र यादरम्यान, भाजपाने अविश्वास प्रस्ताव आणल्यास चर्चेनंतर गहलोत सरकारला आपले बहुमत साबित करावे लागेल.दरम्यान, गहलोतांविरोधात बंड पुकारणारे सचिन पायलट हे महिनाभराच्या नाराजीनाट्यानंतर पुन्हा काँग्रेसमध्ये डेरेदाखल झाले आहेत. आता आज संध्याकाळी होणाऱ्या बैठकीत अशोक गहलोत आणि सचिन पायलट गटाचे आमदार सहभागी होणार आहेत. मात्र सचिन पायलट यांच्या पुनरागमनामुळे अनेक आमदार नाराज असून, या नाराजीमुळे पक्षश्रेष्ठी चिंतीत आहेत. त्यातच बसपाच्या विलीनकरणाचा विषय सध्या न्यायालयात आहे. अशा परिस्थितीत सचिन पायलट यांच्या गटाची मनधरणी करण्यासोबतच आपला आमदारांना एकजूट ठेवण्याचे आव्हान गहलोत यांच्यासमोर असेल.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ताशी १८० किमी वेग, उशीर झाल्यास नुकसान भरपाई; अशा असतील देशातील खासगी ट्रेनमधील सुविधा
केवळ ३८ जणांवर चाचणी, अनेक साइड इफेक्ट्स, असं आहे रशियाच्या कोरोनावरील लसीचं वास्तव
आता घरबसल्या स्मार्टफोनद्वारे बनवता येणार रेशन कार्ड, केवळ या कागदपत्रांची आवश्यकता
वुहानमधील ९० टक्के कोरोनामुक्त रुग्णांची फुप्फुसे झाली खराब, अभ्यासातून समोर आली धक्कादायक माहिती
टाइम कॅप्सुल म्हणजे नेमकं काय? जमिनीत पुरून ठेवण्यामागे असतो हा उद्देश
अमेरिकेला मिळाली कोरोनावरील लस, खरेदी केले १० कोटी डोस
घरी राहिल्यानेही कमी होत नाही कोरोनाच्या संसर्गाचा धोका, संशोधकांचा धक्कादायक खुलासा
कोरोनावरील लस विकसित करण्याच्या शर्यतीत आहेत 'या' सात भारतीय कंपन्या, काहींनी घेतलीय संशोधनात आघाडी