शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

Narayan Rane: “सरकार हमसे डरती है… पुलिस को आगे करती है…”; भाजपचा ठाकरे सरकारला टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2021 21:50 IST

Narayan Rane: सरकार हमसे डरती है… पुलिस को आगे करती है…, असा टोला लगावण्यात आला आहे.

अहमदनगर: केंद्रीयमंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांनी संगमेश्वर पोलिसांनी अटक केली आहे. नारायण राणे यांना घेऊन संगमेश्वर पोलीस महाडला रवाना झाले आहेत. नारायण राणे यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर राज्यभरात याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. दरम्यान, नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर शिवसैनिकांनी राज्यभरात अनेकविध ठिकाणी आंदोलने, निदर्शने केली. यानंतर आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. भाजपच्या अनेक नेत्यांनी या प्रकरणावर टीका केली असून, सरकार हमसे डरती है… पुलिस को आगे करती है…, असा टोला लगावण्यात आला आहे. (bjp chitra wagh criticised thackeray govt over narayan rane arrest)

अटकेनंतर नारायण राणेंची पहिली प्रतिक्रिया; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा उल्लेख करत म्हणाले...

भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी नारायण राणेंच्या अटकेनंतर राज्य सरकारवर कडाडून टीका केली आहे. त्या अहमदनगरला माध्यमांशी बोलत होत्या. अटक करण्याची आणि गुन्हे दाखल करण्याची तत्परता ही फक्त भाजप नेत्यांसाठी आहे, असा आरोप चित्रा वाघ यांनी केला आहे. नारायण राणे यांच्या अटेकसाठी तत्परता दाखवणे आणि इतर प्रकरणी तत्परता न दाखवणे हीच तुमची शिवशाही आहे का? असा सवाल चित्रा वाघ यांनी केला आहे. 

“ठाकरे सरकारचा धिक्कार, सुरुवात तुम्ही केलीय शेवट आम्ही करु”; भाजपचा शिवसेनेला इशारा

सरकार हमसे डरती है आणि पुलिस को आगे करती है

नारायण राणे यांच्या अटकेसाठी जी तत्परता दाखवली ती तत्परता अन्य प्रकरणाबाबत कुठे गेली आहे. पुणे, औरंगाबाद आणि पारनेरमध्ये ती का नाही दाखवली, कायदे आणि नियम फक्त भाजपसाठी आहे, सत्ताधाऱ्यांना लागू होत नाही का, अशी विचारणा चित्रा वाघ यांनी केली आहे. सरकार हमसे डरती है आणि पुलिस को आगे करती है, असे एक ट्विटही चित्रा वाघ यांनी केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक आठवण करुन देत आहे की तमाम हिंदू समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणारा शर्जिल उस्मानी अजून मोकाट हुंदडतोय, असे एक ट्विटही भाजपकडून करण्यात आले आहे.

“छत्रपती संभाजी महाराजांनाही संगमेश्वरात अटक झाली होती आणि औरंगजेब सरकार संपलं होतं”

दरम्यान, उद्धव ठाकरेंना जे करायचे आहे ते करू दे, मला जे करायचे आहे ते मी करेन. ते कायम थोडी मुख्यमंत्री राहणार आहेत, अशाप्रकारे ते कायद्याचा गैरवापर करणार असतील तर आम्ही सुद्धा राजाकरणामध्ये आहोत, असे सांगत गोळवली येथील गोळवलकर गुरुजी स्मृती प्रकल्प येथे मी जेवत असतानाच अचानक तिथे डीसीपी आले आणि तुम्हाला अटक करण्यात येत आहे असे मला सांगितले. मी त्यांना नोटीस दाखवा असे म्हटले. तर त्यांच्याकडे नोटीस वगैरे नव्हती. त्यांनी जबरदस्तीने मला अटक करुन इथे संगमेश्वर पोलीस स्थानकामध्ये आणले. त्यानंतर ते एका रुममध्ये गेले आणि दोन तास बाहेर आले नाहीत. मला त्यांचा हेतू चांगला वाटला नाही. माझ्या जीवाला धोका असल्याप्रमाणे त्याच्या हलचाली होत्या. नंतर तिथे अनेक अधिकारी आले, असा घटनाक्रम नारायण राणे यांनी एका खासगी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना सांगितला.  

टॅग्स :PoliticsराजकारणNarayan Raneनारायण राणेBJPभाजपाShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेChitra Waghचित्रा वाघ