मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार आणि विरोधी पक्ष भाजपमध्ये अनेकविध मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. माजी मंत्री संजय राठोड प्रकरणावरूनही भाजपने ठाकरे सरकार आणि शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला होता. यानंतर आता भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी संजय राऊत यांच्यावर बोचरी टीका केली आहे. सर्वज्ञानी संजय राऊत यांना राहुल गांधी यांनी कौतुकाची थाप काय दिली तर त्यावर आपली स्वामीनिष्ठा, परस्वामीनिष्ठा उफाळून येणे स्वाभाविकच आहे, असा टोला लगावण्यात आला आहे. (bjp chitra wagh criticized shiv sena sanjay raut on rahul gandhi appreciation)
“मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयात जावे म्हणून आता कोर्टात याचिका करायची की आंदोलन”
सर्वज्ञानी संजय राऊत यांना राहुल गांधी यांनी कौतुकाची थाप काय दिली तर त्यावर आपली स्वामीनिष्ठा, परस्वामीनिष्ठा उफाळून येणे स्वाभाविकच आहे. खायचं कुणाचं आणि गायचं कुणाचं? हे आपलं वागणं खरोखर कौतुकास्पद आहे. पण स्वामीनिष्ठा सिद्ध करण्यासाठी बलात्कारासारख्या गंभीर विषयाचंही राजकीय भांडवल करणं हे निंदनीय आहे, अशी टीका चित्रा वाघ यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे. यासोबत चित्रा वाघ यांनी एक व्हिडिओ शेअर करत जोरदार निशाणा साधला आहे.
केवळ लसींचे दोन डोस नाही, तर मुंबई लोकल प्रवासासाठी ‘या’ अटीही पूर्ण कराव्या लागणार!
शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याला स्थानिकांनी चोप दिला
पूजा चव्हाणाच्या मारेकऱ्यांना कोण अभय देत आहे आणि पुणे पोलिसांची त्यात कशी भूमिका राहिली आहे, हे उभ्या महाराष्ट्राने पाहिलं आहे. नव्या अभिनेत्रीला संधी देतो म्हणून शरीरसुखाची मागणी करणाऱ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याला आत्ताच स्थानिकांनी चोप दिला, असे चित्रा वाघ यांनी व्हिडिओमध्ये म्हटले आहे.
आम्ही जिजाऊच्या लेकी आहोत
महाविकास आघाडीतील किती जणांचे हात महिलांविरोधी कृत्यांमध्ये बरबटलेले आहेत हे उभ्या महाराष्ट्राने पाहिले. आपल्या अत्याचाराविरूद्धसुद्धा माझ्या एका भगिनीने न्याय मिळण्याकरिता उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. आम्ही जिजाऊच्या लेकी आहोत. आम्ही आता या अत्याचारी प्रवत्तीविरूद्ध लढायचे ठरवले त्यामुळेच की काय आपल्याला भितीपोटी असे दाखले द्यावे लागतात, असे त्यांनी सांगितले.