शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024:- घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
4
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
6
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
7
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
9
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
10
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
11
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
12
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
13
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
14
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
15
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
16
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
17
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
18
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
19
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
20
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण

"सर्वोच्च ज्ञानी सोनिया सेनेच्या प्रवक्त्यांचा जावईशोध"; चित्रा वाघ यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2021 10:53 AM

BJP Chitra Wagh Slams Shivsena Sanjay Raut : भाजपा नेत्या चित्रा वाघ (BJP Chitra Wagh) यांनी संजय राऊत यांना टोला लगावला आहे.

मुंबई - शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राष्ट्रीय नेत्यांच्या सुरक्षेवरुन केंद्र सरकावर जोरदार टीका केली होती. राऊतांच्या या टीकेला भाजपाने आता प्रत्युत्तर दिलं आहे. भाजपा नेत्या चित्रा वाघ (BJP Chitra Wagh) यांनी संजय राऊत यांना यावरून सणसणीत टोला लगावला आहे. "सर्वोच्च ज्ञानी सोनिया सेनेच्या प्रवक्त्यांचा जावईशोध" असं म्हणत निशाणा साधला आहे. राष्ट्राची चिंता करण्यासाठी मोदीजी सक्षम आहेत आपण मुंबईची चिंता करा असं देखील म्हटलं आहे. तसेच "जरा जास्त पाऊस पडला तर मुंबईची तुंबई होते. या समस्यांवर आपण आपल्या दिव्य ज्ञानाचा प्रकाश टाकणं फार गरजेचं आहे" असं म्हणत हल्लाबोल केला आहे. 

चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत काही ट्विट्स केले आहेत. "सर्वोच्च ज्ञानी व सोनिया सेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी आपल्या प्रात:कालीन सवयीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि देशातील तमाम बड्या नेत्यांना सुरक्षा पुरवली जातेय ही अनाठायी आहे असा जावईशोध लावला आहे. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय प्रश्नांवर अत्यंत परखड भूमिका मोदीजी घेत असतात. अशावेळी त्यांची सुरक्षा ही राष्ट्रीय सुरक्षेचा विषय असतो. हे आपल्याला कितपत व कसे समजेल हे मला सांगता येणार नाही कारण हा विषय खूप मोठा आहे" अशा शब्दांत चित्रा वाघ यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. 

"तरी आपणास असं खरंच वाटत असेल तर आपल्या राज्याचे सन्माननीय यांची सुरक्षा काढून घ्यावी आणि स्वतःपासून आदर्श घालून द्यावा असा प्रयोग करायला काय हरकत आहे?, गेली दीड वर्ष मुख्यमंत्रीजी हे त्यांचा बराच वेळ मातोश्री निवासस्थानी किंवा वर्षा या शासकीय बंगल्यावरच व्यतित करतात… ते कुठे फारसे फिरत नाहीत त्यामुळे सध्या त्यांच्या सुरक्षेची तेवढी काळजी नाही" असा टोला चित्रा वाघ यांना लगावला आहे. तसेच "आपले राष्ट्रीय पातळीवरील अस्तित्व बिहार निवडणुकीत मिळालेल्या मतांमुळे जनतेपुढे आलेले आहे. यामुळे आपल्याला मला सांगायचंय संजयजी की राष्ट्राची चिंता करण्यासाठी मोदीजी सक्षम आहेत."

"आपण आपले ज्ञान राज्य पातळीवर उपयोगात आणावे. कारण लोकल बंद झाल्यामुळे लोकांना हेलपाटे मारावे लागत आहेत. जरा जास्त पाऊस पडला तर मुंबईची तुंबई होते... या समस्यांवर आपण आपल्या दिव्य ज्ञानाचा प्रकाश टाकणं फार गरजेचं आहे" असं म्हणत चित्रा वाघ यांनी हल्लाबोल केला आहे. याआधीही अनेकदा चित्रा वाघ यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. काही दिवसांपूर्वी "महाविकास आघाडीत किती आलबेलं आहे हे त्यांच्या येरझाऱ्यांवरून दिसतंय" असं म्हणत त्यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला होता.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतChitra Waghचित्रा वाघBJPभाजपाShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारणMumbaiमुंबई