BJP Foundation Day: ४१ वर्षाच्या राजकीय प्रवासात भाजपानं कोणाची साथ घेतली अन् कोणाला डच्चू दिला?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2021 09:50 AM2021-04-06T09:50:14+5:302021-04-06T09:51:52+5:30

भाजपाच्या ४१ वर्षाच्या कारकिर्दीत शून्यापासून शिखरापर्यंत पोहचण्यामागे वैचारिक विरोधक लेफ्टसारख्या पक्षांसोबत हातमिळवणीचा प्रयोग असेल

BJP Foundation Day: Whom did BJP support in its 41-year political journey? | BJP Foundation Day: ४१ वर्षाच्या राजकीय प्रवासात भाजपानं कोणाची साथ घेतली अन् कोणाला डच्चू दिला?

BJP Foundation Day: ४१ वर्षाच्या राजकीय प्रवासात भाजपानं कोणाची साथ घेतली अन् कोणाला डच्चू दिला?

Next
ठळक मुद्देस्वातंत्र्यानंतर दक्षिणपंथी राजकारणामुळे श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी जनसंघाची स्थापना केली. परंतु काँग्रेसच्या लोकप्रियतेपुढे ते यशस्वी होऊ शकले नाही.इंदिरा गांधी यांच्याविरोधात राजकीय प्रयोग अयशस्वी राहिल्यानंतर १९७९ मध्ये जनता पार्टीत चरण चौधरींनी समर्थकांसह बंडखोरी केली. ६ एप्रिल १९८० मध्ये भारतीय जनता पार्टीच्या नावानं राजकीय पक्षाची स्थापना केली. अटलबिहारी वाजपेयी भाजपाचे पहिले अध्यक्ष बनले आणि १९८४ मध्ये निवडणुकीत भाजपाला केवळ २ जागा मिळाल्या होत्या.

नवी दिल्ली – भारतीय जनता पार्टी सध्याच्या राजकीय इतिहासात सर्वात यशस्वी आणि सक्षम पक्ष बनला आहे. जिथे केंद्राच्या सत्तेपासून देशातील अर्ध्या राज्यात भाजपाचं सरकार आहे. मात्र या यशामागं अनेक वर्षाचा संघर्ष आहे. स्वातंत्र्यानंतर काही वर्षात १९५१ मध्ये जनसंघाचा पाया रोवला गेला आणि आणीबाणीच्या काळात जनता पार्टीत त्याचं रुपांतर झालं. पुढे जाऊन ६ एप्रिल १९८० मध्ये भारतीय जनता पार्टी स्थापन झाली.

भाजपाच्या ४१ वर्षाच्या कारकिर्दीत शून्यापासून शिखरापर्यंत पोहचण्यामागे वैचारिक विरोधक लेफ्टसारख्या पक्षांसोबत हातमिळवणीचा प्रयोग असेल, काँग्रेसला सत्तेपासून रोखण्यासाठी जनता दलाची साथ आणि जम्मू काश्मीरमध्ये सरकार बनवण्यासाठी पीडीपी आणि नॅशनल कॉन्फरन्ससारख्या पक्षांना सोबत घेण्यातही भाजपा मागे राहिली नाही. भाजपाने राजकीय शिखर गाठण्यासाठी कोणत्या पक्षाची साथ घेतली आणि सत्तेसाठी कोणाचं समर्थन घेतलं हे जाणून घेऊया

डाव्या पक्षांसोबत पहिला राजकीय प्रयोग

स्वातंत्र्यानंतर दक्षिणपंथी राजकारणामुळे श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी जनसंघाची स्थापना केली. परंतु काँग्रेसच्या लोकप्रियतेपुढे ते यशस्वी होऊ शकले नाही. १९७५ मध्ये जेव्हा इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लावली. तेव्हा जनसंघ त्याच्याविरोधात मैदानात उतरला. जनसंघाच्या अनेक नेत्यांना जेलमध्ये जावं लागलं. १९७७ मध्ये आणीबाणी संपल्यानंतर देशात निवडणुका झाल्या. तेव्हा जनसंघाचं जनता पार्टीत रुपांतर झालं. ज्यात सोशलिस्ट, काँग्रेस बंडखोर, डाव्यांचा एक गट जनता पार्टीसोबत उभा राहिला तर दुसरा गट काँग्रेससोबत.

इंदिरा गांधी यांच्याविरोधात राजकीय प्रयोग अयशस्वी राहिल्यानंतर १९७९ मध्ये जनता पार्टीत चरण चौधरींनी समर्थकांसह बंडखोरी केली. त्यामुळे मोरारजी देसाईच्या नेतृत्वाखालील सरकार कोसळलं. काँग्रेसच्या समर्थनाने चौधरी चरण सिंह पंतप्रधान बनले. त्यानंतर जनसंघातून आलेल्या नेत्यांनी जनता पार्टीपासून स्वत:ला वेगळं केले. ६ एप्रिल १९८० मध्ये भारतीय जनता पार्टीच्या नावानं राजकीय पक्षाची स्थापना केली. अटलबिहारी वाजपेयी भाजपाचे पहिले अध्यक्ष बनले आणि १९८४ मध्ये निवडणुकीत भाजपाला केवळ २ जागा मिळाल्या होत्या.

१९८९ मध्ये लोकसभा निवडणुकीनंतर देशात आघाडीचं राजकारण सुरू झालं. काँग्रेसला रोखण्यासाठी पहिल्यांदा डावे, भाजपा आणि जनता दल एकत्र आले. तत्कालीन राजीव गांधी सरकार बोफोर्स घोटाळा, एलटीटीई आणि श्रीलंका सरकारच्या अंतर्गत युद्धापर्यंत अनेक मुद्द्यावर अडकलं होतं. काँग्रेससोडून जनता दल स्थापन करणारे वीपी सिंह विरोधकांचा मुख्य चेहरा बनले. १९८९ मध्ये कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालं नाही. काँग्रेस सर्वात मोठा पक्ष बनला. काँग्रेसने विरोधात बसण्याचा निर्णय घेतला. जनता दल आणि इतर स्थानिक राजकीय पक्षांनी मिळून नॅशनल फ्रंट बनवत सरकारची स्थापना केली. पहिल्यांदाच काँग्रेसला सत्तेपासून रोखण्यासाठी विविध विचारांचे पक्ष एकत्र आले. वीपी सिंह पंतप्रधान बनले. १९९१ मध्ये लालकृष्ण अडवाणी यांनी राम मंदिरासाठी रथयात्रा काढली तेव्हा लालू प्रसाद यादव यांनी बिहारमध्ये त्यांना अटक केली. त्यामुळे भाजपाने जनता दल सरकारचं समर्थन काढून घेतलं. तेव्हा ११ महिन्यांनी वीपी सिंह सरकार विश्वासदर्शक ठराव हरली आणि सरकार कोसळलं.

१९९८ मध्ये भाजपाने युतीचं राजकारण सुरू केले. यात स्थानिक प्रादेशिक पक्षांसोबत मिळून भाजपानं NDA ची स्थापना केली. यात पंजाबमध्ये अकाली दल, बिहारमध्ये समता पार्टी तर महाराष्ट्रात शिवसेना आधीपासून भाजपाच्या सोबत होती. दक्षिण भारतात तेलगु देशम पार्टीला सोबत घेतलं तर ओडिशामध्ये बीजू जनता NDA त सामील झाली. उत्तर प्रदेशात कांशीरामच्या बसपाला समर्थन देत मायावती सरकार बनवलं होतं.

भाजपाच्या नेतृत्वात NDA ला १९९८ लोकसभा निवडणुकीत यश मिळालं. अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वात सरकार बनलं मात्र हे सरकार १३ महिन्यांहून अधिक काळ चाललं नाही. त्यानंतर भाजपाने १९९९ मध्ये सहकारी पक्षांसोबत मिळून निवडणूक लढवली आणि सलग ५ वर्ष सरकार चालवलं. अटलबिहारी वाजपेयी बिगर काँग्रेसी पहिले पंतप्रधान होते ज्यांनी ५ वर्ष पूर्ण केली होती.

Web Title: BJP Foundation Day: Whom did BJP support in its 41-year political journey?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.