नवी दिल्ली - सत्तेच्या डावपेचात भाजपानेकाँग्रेसला पुन्हा एकदा मोठा धक्का दिला आहे. राजस्थानमधील काँग्रेस सरकार पाडण्यात अपयश आले असले तरी मणिपूरमध्ये काँग्रेसला सुरुंग लावण्यात भाजपाला यश आले आहे. मणिपूरमध्ये भाजपाच्या नेतृत्वातील सरकार अस्थिर करण्याची काँग्रेसची खेळी भाजपाने काँग्रेसवरच उलटवली असून, काँग्रेसच्या मणिपूरमधील पाच आमदारांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची भेट घेतली.भाजपाच्या काही आमदारांनी दिलेले राजीनामे आणि मित्रपक्षाच्या आमदारांची नाराजी यामुळे मणिपूरमधील एन. बीरेन सिंह यांच्या नेतृत्वाखालील सरकार अस्थिर झाले होते. दरम्यान, या महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या बहुमत चाचणीवेळी काँग्रेसच्या सहा आमदारांनी पक्षाने बजावलेला व्हिप धुडकावून लावत विधानसभेच्या एकदिवसीय अधिवेशनाला दांडी मारली होती. त्यामुळे बिरेन सिंह सरकारला बहुमत मिळवणे सोपे गेले होते. दरम्यान, या सहा आमदारांनी काँग्रेससोबत विधानसभेच्या सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ताशी १८० किमी वेग, उशीर झाल्यास नुकसान भरपाई; अशा असतील देशातील खासगी ट्रेनमधील सुविधा
केवळ ३८ जणांवर चाचणी, अनेक साइड इफेक्ट्स, असं आहे रशियाच्या कोरोनावरील लसीचं वास्तव
आता घरबसल्या स्मार्टफोनद्वारे बनवता येणार रेशन कार्ड, केवळ या कागदपत्रांची आवश्यकता
वुहानमधील ९० टक्के कोरोनामुक्त रुग्णांची फुप्फुसे झाली खराब, अभ्यासातून समोर आली धक्कादायक माहिती
टाइम कॅप्सुल म्हणजे नेमकं काय? जमिनीत पुरून ठेवण्यामागे असतो हा उद्देश
अमेरिकेला मिळाली कोरोनावरील लस, खरेदी केले १० कोटी डोस
घरी राहिल्यानेही कमी होत नाही कोरोनाच्या संसर्गाचा धोका, संशोधकांचा धक्कादायक खुलासा
कोरोनावरील लस विकसित करण्याच्या शर्यतीत आहेत 'या' सात भारतीय कंपन्या, काहींनी घेतलीय संशोधनात आघाडी