MPSC: “अजित पवारांना फक्त स्वत:च्या मुलाच्या पुनर्वसनाची चिंता, इतरांचं काही पडलेलं नाही”
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2021 01:02 PM2021-08-01T13:02:32+5:302021-08-01T13:04:26+5:30
MPSC: उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फक्त त्यांच्या मुलाच्या पुनर्वसनाची चिंता आहे काय, अशी विचारणा केली आहे.
सांगली: गेल्या महिन्यात MPSC परीक्षा उत्तीर्ण होऊनही नियुक्ती मिळाली नाही. शेवटी नैराश्यामुळे पुण्यातील एका मुलाने आत्महत्या केली होती. यावरून ठाकरे सरकारवर भाजपसह अन्य विरोधी पक्षांची चांगलीच टीकेची झोड उठवली होती. यानंतर ३१ जुलैपर्यंत एमपीएससीद्वारे राज्यातील रिक्त जागा भरू, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले होते. यासंदर्भात अजित पवार यांच्यावर निशाणा साधत भाजप आमदाराने राज्यात पुन्हा स्वप्नील लोणकर प्रकरणाची पुनरावृत्ती व्हावी अशी अपेक्षा सरकारला आहे काय? उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फक्त त्यांच्या मुलाच्या पुनर्वसनाची चिंता आहे काय, अशी विचारणा केली आहे. (bjp gopichand padalkar criticises ajit pawar over mpsc)
गेल्या अनेक दिवसांपासून अनेकविध मुद्द्यांवरून भाजप आमदार गोपीचंद पडळकरराष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह पवार कुटुंबीयांवर टीका करताना दिसत आहेत. MPSC च्या परीक्षा रखडल्याच्या मुद्द्यावरून गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा पवार कुटुंबीयांवर टीकास्त्र सोडले.
...तरच मागणी मान्य होऊ शकेल; मोदी सरकारने Tesla समोर ठेवली ‘ही’ अट!
अजित पवारांची खोटे बोलत दिशाभूल
३१ जुलैपर्यंत राज्यातील रिक्त जागा एमपीएससीद्वारे भरू, अशी घोषणा त्यांनी सभागृहात केली होती. पण, सभागृहातून बाहेर पडताच MPSC आयोगावरील रिक्त सदस्यांच्या चार जागा भरू, असा त्यांनी शब्द फिरवला. खोटे बोलत अजित पवारांनी सभागृहाची दिशाभूल केली. ३१ जुलै उलटून गेला तरीही MPSC ची कोणतीही परीक्षा झालेली नाही. तसेच आयोगावरील सदस्यांच्या रिक्त जागाही भरलेल्या नाहीत. त्यामुळे या सरकारला MPSC चा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत काहीच देणेघेणे नाही, असे वाटते, असे पडळकर यांनी म्हटले आहे.
या प्रस्थापितांना फक्त आपल्याच पोरा बाळांच्या आमदारकी खासदारकीच पडलेलं आहे.. बाकी किती स्वप्नील लोणकर येतील जातील या विषयी त्यांना काहीही पडलेलं नाही.@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@BJP4Maharashtra
— Gopichand Padalkar (@GopichandP_MLC) August 1, 2021
“GST भरायला नकार द्या! मग केवळ CM उद्धव ठाकरेच नाही, तर PM मोदीही तुमच्याकडे येतील”
अजित पवारांना मुलाच्या पुनर्वसनाची चिंता
कदाचित पुन्हा एकदा स्वप्नील लोणकर या होतकरू विद्यार्थ्याने निवडलेला आत्महत्येचा मार्ग आणखी काही विद्यार्थ्यांनी निवडावा, असे या प्रस्थापितांच्या सरकारला वाटतेय काय? म्हणूनच अजित पवारांनी सभागृहात दिलेला शब्द पाळला नाही. याचा अर्थ ते अधिवेशनातही धडधडीत खोट बोलत होते. या प्रस्थापितांना फक्त आपल्याच पोराबाळांच्या आमदारकी, खासदारकीचे पडले आहे. बाकी किती स्वप्नील लोणकर येतील जातील याविषयी त्यांना काहीही पडलेले नाही, असा घणाघात पडळकर यांनी यावेळी केला.