“वेगवेगळी विधाने करणारे अजित पवार काय म्हणतात याला काडीची किंमत नाही”

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2021 06:52 PM2021-08-23T18:52:59+5:302021-08-23T18:57:04+5:30

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

bjp gopichand padalkar criticized deputy cm ajit pawar over bullock cart race | “वेगवेगळी विधाने करणारे अजित पवार काय म्हणतात याला काडीची किंमत नाही”

“वेगवेगळी विधाने करणारे अजित पवार काय म्हणतात याला काडीची किंमत नाही”

Next
ठळक मुद्देअजित पवार काय म्हणतात, त्याला काडीची किंमत नाहीत्यांनी अनेकदा वेगवेगळी स्टेटमेंट दिली आहेबैलगाडा शर्यत चालू नाही झाली तर अजित पवार नाव सांगणार नाही, असेही म्हटले होते

कराड: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील बैलगाडा शर्यतीवरून राजकारण तापल्याचे पाहायला मिळत आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पोलिसांना चकवा देऊन गनिमी कावा करत बैलगाडा शर्यत घेतली. या घटनेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कारवाईचे संकेत दिले होते. यावर आता गोपीचंद पडळकर यांनी टीका केली असून, अजित पवार यांनी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी स्टेटमेंट दिली आहेत. त्यामुळे अजित पवार काय म्हणतात याला काडीची किंमत नाही, असा पलटवार पडळकर यांनी केला आहे. (bjp gopichand padalkar criticized deputy cm ajit pawar over bullock cart race)  

“१४ महिने मंत्रालयात न येणारा मुख्यमंत्री उत्कृष्ट कसा काय?”; भाजपची विचारणा

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी कराडमधील बैलगाडा मालक धनाजी शिंदे यांची भेट घेतली. यावेळी पडळकर यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला. अजित पवार काय म्हणतात, त्याला काडीची किंमत नाही. त्यांनी अनेकदा वेगवेगळी स्टेटमेंट दिली आहे. हा राजकारणाचा मुद्दा नाही, असे पडळकर यांनी म्हटले आहे. 

Vi चे आता BSNL मध्ये विलिनीकरण होणार? मोदी सरकारने स्पष्ट केली भूमिका

महाविकास आघाडी सरकार मोगलांच्या वृत्तीचे

महाविकास आघाडी सरकार मोगलांच्या वृत्तीचे सरकार आहे. अजित पवार यांनी अनेकदा वेगवेगळी स्टेटमेंट दिली आहे. हा राजकारणाचा मुद्दा नाही. त्यांची भाषणे काढून पाहा. बैलगाडा शर्यत चालू नाही झाली तर अजित पवार नाव सांगणार नाही, अशी त्यांची भाषणे आहेत, असा खोचक टोला पडळकर यांनी लगावला. दुसरीकडे, मराठा आरक्षणाचा वकील त्यांनीच नेमला होता. आम्ही मराठा आरक्षणाबाबत योग्य मत मांडू शकलो नाहीत, असे पडळकर यांनी सांगितले. 

“महाराष्ट्रात कोणताही पक्ष स्वबळावर सत्ता स्थापन करू शकत नाही”; केंद्रीय मंत्र्यांचा दावा

दरम्यान, बैलगाडा शर्यत केंद्र सरकारच्या अखत्यारित असलेला प्रश्न आहे. संसदेत अनेकदा हा प्रश्न उपस्थित केला गेला आहे. सध्या काहीजण स्टंटबाजी करत आहेत. जे स्टंट करतात त्यांचेच मागच्या पाच वर्षात सरकार होते. त्यांना कोणीही अडवले नव्हते. आताही केंद्रात त्यांचेच सरकार आहे. सध्या केवळ लोकांची दिशाभूल करण्याचे काम सुरु आहे. आम्ही लोकांचे भले करतोय, असे दाखवण्याचा त्यांचा केविलवाणा प्रयत्न सुरु आहे, असे सांगत अजित पवार यांनी पडळकर यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. तसेच वास्तविक कोणत्याही पक्षाचा व्यक्ती असेल आणि त्यांच्याकडून कायद्याचे उल्लंघन होत असेल तर नियमानुसार त्यांच्यावर कारवाई होईल. गुन्हे दाखल केले जातील, असे अजित पवार यांनी सांगितले होते.
 

Web Title: bjp gopichand padalkar criticized deputy cm ajit pawar over bullock cart race

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.