मुंबई: भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. यानंतर आता राजकीय वर्तुळातून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. गाडीवर झालेल्या दगडफेकीबाबत गोपीचंद पडळकर यांनी प्रतिक्रिया देत, प्रस्थापितांचा बहुजनांवर हल्ला असल्याचे म्हटले आहे. (bjp gopichand padalkar target rohit pawar over car attack)
भाजप आमदार गोपीचंद पडळकर गेल्या अनेक दिवसांपासून शरद पवार, अजित पवार यांच्यावर सातत्याने टीका करताना पाहायला मिळत आहे. मात्र, बुधवारी शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर निशाणा साधला. आता या एकूण प्रकारावर स्वतः गोपीचंद पडळकर यांनी भाष्य केले आहे. पडळकरांनी गाडीवरील दगडफेकीनंतर रात्री उशिरा एक ट्विट केले.
“तुम्ही तरी एकच काच फोडली, आम्ही एक सुद्धा शिल्लक ठेवणार नाही”; राणेंचा थेट इशारा
प्रस्थापितांचा बहुजनांवर हल्ला
प्रस्थापितांचा बहुजनांवर हल्ला, या शब्दांत गोपीचंद पडळकर यांनी या दगडफेकीचं वर्णन केले आहे. पण अश्या भ्याड हल्ल्यानं बहुजनांचा आवाज ना काल दबला होता ना आज दबला आहे ना उद्याही दबेल... घोंगडी बैठका सुरूच राहणार..., असा निर्धार गोपीचंद पडळकर यांनी ट्विटरवरून व्यक्त केला आहे. मात्र, या ट्विटसह राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि एका कार्यकर्त्याचा फोटो पडळकर यांनी ट्विट केला आहे. त्यामुळे पडळकर यांचा रोख रोहित पवार यांच्याकडे असल्याचे सांगितले जात आहे.
गोपीचंद पडळकर यांनी सध्या बहुजन संवाद दौरा
गोपीचंद पडळकर यांनी सध्या बहुजन संवाद दौरा सुरू केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून पडळकर सोलापूर जिल्ह्यात घोंगडी बैठका घेत आहेत. यावेळी पत्रकारांशी बोलताना, शरद पवार हे साडेतीन जिल्ह्यांचे स्वामी आहेत. ते मोठे नेते आहेत असे मी मानत नाही, तुम्ही कोणी तसे मानत असाल तर तो तुमचा प्रश्न आहे. शरद पवार हे गेल्या ३० वर्षांपासूनचे भावी पंतप्रधान आहेत आणि त्यांच्या भावी पंतप्रधान पदासाठी माझ्या शुभेच्छा. दिल्लीतील राजकारण मला कळत नाही. पण काही कोंबडे दिल्लीत एकत्र आले होते. मात्र, 'रात्र गेली हिशेबात पोरगं नाही नशीबात, अशी यांची परिस्थिती झाली आहे, असे पडळकर यांनी म्हटले होते.
“निवडणुका म्हणजे अत्याचार दूर होण्याची हमी नाही”: सरन्यायाधीश
दरम्यान, भाजप नेते निलेश राणे यांनी गाडीवरील दगडफेकीवर प्रतिक्रिया देत थेट इशारा दिला आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीची एक काच फोडून जर कोणाला वाटत असेल की आम्ही मोठा पराक्रम केला तर एवढं समजून चला जेव्हा तुमच्या हातातली सत्ता जाईल तेव्हा फुटलेल्या काचा मोजण्यात पुढची पाच वर्षे जातील, हे लक्षात असू दे. तुम्ही तरी एकच काच फोडली आम्ही एक सुद्धा शिल्लक ठेवणार नाही, असा इशारा निलेश राणे यांनी दिला आहे.