Haryana Result: हरियाणात भाजपाला जोरदार धक्का; दोन नगरपरिषदा, तीन नगरपालिका हातच्या गेल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2020 04:05 PM2020-12-30T16:05:32+5:302020-12-30T16:09:02+5:30

Haryana Election Result: हरियाणामध्ये झालेल्या निवडणुकांचे निकाल आज लागणार आहेत. तीन नगरपालिका निवडणुकीत भाजपा-जेजेपी आघाडीला मोठा झटका लागला आहे.

BJP hit hard in Haryana; Two municipal councils, three municipalities lost | Haryana Result: हरियाणात भाजपाला जोरदार धक्का; दोन नगरपरिषदा, तीन नगरपालिका हातच्या गेल्या

Haryana Result: हरियाणात भाजपाला जोरदार धक्का; दोन नगरपरिषदा, तीन नगरपालिका हातच्या गेल्या

Next

कर्नाटसोबतच भाजपा सत्ताधारी असलेल्या हरियाणामध्येही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या. शेतकरी आंदोलनाने पंजाब, हरियाणातील वातावरण तापलेले असतानाच नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुका झाल्याने याचा थेट फटका भाजपाला बसल्याचे दिसत आहे. यामुळे  दोन नगरपरिषदा, तीन नगरपालिका भाजपाला गमवाव्या लागल्या आहेत. 


हरियाणामध्ये झालेल्या निवडणुकांचे निकाल आज लागणार आहेत. तीन नगरपालिका निवडणुकीत भाजपा-जेजेपी आघाडीला मोठा झटका लागला आहे. तिन्ही ठिकाणी अध्यक्षाची निवडणूक अपक्ष उमेदवार जिंकले आहेत. हिसारच्या उकलाना, रोहतकच्या सांपला आणि रेवाडीच्या धारुहेडामध्ये अपक्षांनी बाजी मारली आहे. 


उकलानामध्ये अपक्ष उमेदवार सुशील साहू यांनी भाजपाचे उमेदवार महेंद्र सोनी यांना पाडले आहे. सांपला नगरपालिकेत भाजपाच्या उमेदवार सोनू यांना अपक्ष उमेदवार पुजा यांनी मोठ्या मतफरकाने हरविले आहे. महत्वाचे म्हणजे पूजा या काँग्रेसच्या कार्यकर्त्या आहेत. परंतू काँग्रेस याठिकाणी पक्षाच्या निशानीवर लढली नव्हती. यामुळ पूजा या अपक्ष ठरल्या होत्या. धारुहेडामध्येही अपक्ष उमेदवार कंवर सिंह जिंकले आहेत. 


अंबालामध्ये शक्ती राणी जिंकल्या आहेत. त्यांनी भाजपाच्या उमेदवार डॉ. वंदना शर्मा यांना हरविले आहे. राणी यांना 37604 मते मिळाली, तर शर्मा यांना 29520 मते मिळाली. काँग्रेस चौथ्या नंबरवर राहिली. सोनीपतमध्ये काँग्रेसचे उमेदवार निखिल मदान यांनी भाजपाच्या लिलत बत्रा यांना 13818 मताधिक्याने हरविले आहे. 

एकाच ठिकाणी भाजपा जिंकली
पंचकुला नगरपरिषदेमध्ये भाजपाचे कुलभूषण गोयल यांनी विजय मिळविला आहे. त्यांनी काँग्रेसचे उपिंदर अहलुवालिया यांना पराभूत केले. 

कर्नाटकमध्ये भाजपा आघाडीवर

एकीकडे महाराष्ट्रात ग्राम पंचायत निवडणुकीचे फॉर्म भरणे, पॅनल उभे करणे आदीची लगबग सुरु असताना शेजारील कर्नाटकमध्ये आज 5,762 ग्राम पंचायतींवर कोणाचे राज्य असणार य़ाचा निकाल सुरु झाला आहे. दोन टप्प्यांत झालेल्या मतदानाची मतमोजणी सुरु झाली असून 81 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याने ही लढत चुरशीची होणार असल्याचे सांगितले जात आहे. 

22 आणि 27 डिसेंबरला मतदान झाले होते. काँग्रेस, जेडीएसकडून सत्ताखेचून आणलेल्या सत्ताधारी भाजपाने दोन्ही विरोधकांना धोबीपछाड देत 80 टक्के ग्रामपंचायती आपल्या ताब्यात घेण्याची योजना बनविली होती. आजच्या निकालाच्या सुरुवातीच्य़ा कलानुसार 80 टक्के ग्रामपंचायती ताब्यात घेण्याचे दिसत नसले तरीही भाजपाच वरचढ ठरल्याचे दिसत आहे. 

भाजपा 3,865, काँग्रेस 1,988 आणि जेडीएस 1,030 जागांवर पुढे आहे. सुरुवातीपासूनच भाजपाने मोठी उसळी घेतलेली आहे. राज्यात एकूण 6,004 ग्रामपंचायती आहेत. मात्र, कायदेशीर कारणांमुळे 242 ग्राम पंचायतींच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या नव्हत्या. एकूण 94,348 जागांसाठी 2.8 लाख उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. मुख्यमंत्री येडीयुराप्पा यांनी सांगितले की, 85 ते 90 टक्के भाजप आणि समर्थक उमेदवार जिंकतील. 
काही अपवाद वगळता निवडणूक शांततेत पार पडली होती. मात्र, ग्राम पंचायत सदस्य़ाची सीट मिळविण्यासाठी काही ठिकाणी उमेदवारांकडून २ ते 12 लाख रुपये देवस्थान, गावाच्या विकासासाठी देण्यात आल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली होती. आज मतदान होत असले तरी निकाल उद्याच जाहीर होतील असे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. 

Web Title: BJP hit hard in Haryana; Two municipal councils, three municipalities lost

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.