“आधी काँग्रेसला स्वतःचं नाव बदलावं लागेल”: ज्योतिरादित्य शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2021 10:07 PM2021-06-21T22:07:05+5:302021-06-21T22:09:05+5:30

काँग्रेस नामदारांचा पक्ष आहे तर भाजपा कामगारांचा पक्ष आहे, असे ज्योतिरादित्य शिंदे यावेळी म्हणाले. 

bjp jyotiraditya scindia criticised congress over name change issue | “आधी काँग्रेसला स्वतःचं नाव बदलावं लागेल”: ज्योतिरादित्य शिंदे

“आधी काँग्रेसला स्वतःचं नाव बदलावं लागेल”: ज्योतिरादित्य शिंदे

Next
ठळक मुद्देआधी काँग्रेसला स्वतःचं नाव बदलावं लागेलकाँग्रेस नामदारांचा तर भाजप कामगारांचा पक्ष ज्योतिरादित्य शिंदे यांची काँग्रेसवर टीका

ग्वाल्हेर: कोरोनाची दुसरी लाट बऱ्यापैकी ओसरताना पाहायला मिळत आहे. कोरोना संकटावर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरण हाच उत्तम उपाय असल्याचे सांगितले जात आहे. देशभरात कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू असून, मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबवली जात आहे. मात्र, यातही राजकीय आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. एका लसीकरण मोहिमेचा शुभारंभ भाजप खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांनी केला. यावेळी त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला असून, काँग्रेसला स्वतःच्या नावात बदल करावा लागेल, असे म्हटले आहे. (bjp jyotiraditya scindia criticised congress over name change issue)

देशभरामध्ये आजपासून व्हॅक्सिन फॉर ऑल म्हणजेच सर्वांसाठी मोफत लस मोहिम सुरु केली आहे. याचाच एक भाग म्हणून ज्योतिरादित्य शिंदे यांनी ग्वाल्हेरमध्ये या मोहिमेचा शुभारंभ केला. हजीरा येथील प्रशासकीय रुग्णालयामधील लसीकरण केंद्रामध्ये लोकांना लसीकरण करुन घेण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी ते हजर झाले होते. जागतिक योग दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्वाखाली १० लाख लोकांचे लसीकरण केले जाणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. काँग्रेस नामदारांचा पक्ष आहे तर भाजपा कामगारांचा पक्ष आहे, असे ज्योतिरादित्य शिंदे यावेळी म्हणाले. 

कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी अमरनाथ यात्रा रद्द; तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर निर्णय

काँग्रेसला नाव बदलावं लागेल

देशात आणि मध्य प्रदेशात कोरोनाच्या महामारीचा फैलाव होत होता, तेव्हा काँग्रेसने राजकारण केले. काँग्रेस कधी लसीकरण करणार नाही असे सांगते, तर कधी लसींमध्ये मांस असल्याचं सांगते, आता ते स्वत:च लस घेण्यासाठी धावपळ करत आहेत. काँग्रेसला ग्वाल्हेरचे नाव बदलण्याची एवढीच इच्छा आहे, तर त्यांना आधी स्वत:चे नाव बदलावे लागले. लोकांच्या मनामध्ये पुन्हा स्थान मिळवण्यासाठी काँग्रेसला नाव बदलावे, असे ज्योतिरादित्य शिंदे यांनी म्हटले आहे. 

कोरोना संकटातही एप्रिल महिन्यात मोठी नोकरभरती; १२.७६ लाख नवे रोजगार!

दरम्यान, एकाच दिवसात ६९ लसींचा रेकॉर्डब्रेक कार्यक्रम पूर्ण करण्यात आला. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलेय. तसेच, उद्योजक आनंद महिंद्रा यांनीही शाबास इंडिया... म्हणत लसीकरण मोहिमेचे कौतुक केले. वेल डन इंडिया. देशात एकाच दिवसांत रेकॉर्डब्रेक लसीकरण करण्यात आले आहे. कोरोनाच्या लढाईत लसीकरण हेच सर्वात मोठे शस्त्र आहे. ज्यांनी लस घेतली त्या सर्वांचे अभिनंदन, तसेच सर्वच फ्रंटलाईन वर्कर्संचेही कौतुक, असे ट्विट पंतप्रधान मोदींनी केले आहे. 
 

Web Title: bjp jyotiraditya scindia criticised congress over name change issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.