मुंबई: भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे वादात सापडलेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यामागे असलेल्या ईडीचा ससेमिरा अद्यापही कायम असल्याचे दिसत आहे. यावरून सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना पाहायला मिळत आहे. ईडीने पाठवलेल्या नोटिसीवर अनिल देशमुख यांनी चौकशीला प्रत्यक्ष हजर राहण्यास असमर्थता दर्शवली असून, यावर आता भाजपकडून टीका करण्यात आली आहे. (bjp keshav upadhye criticised anil deshmukh over ed notice)
सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) चौकशी करण्यासाठी अनिल देशमुखांना नोटीस बजावण्यात आली होती. मंगळवार, २९ जून रोजी प्रत्यक्ष चौकशीसाठी अनिल देशमुख यांना उपस्थित राहण्यास ईडीकडून सांगण्यात आले होते. मात्र, वय, आजारपण आणि कोरोनाच्या धोक्याचं कारण पुढे करत अनिल देशमुखांनी ईडीच्या चौकशीला हजर राहण्यास नकार दिला. यावरून भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी अनिल देशमुख यांच्यावर निशाणा साधला आहे.
गडकरींची मोठी योजना! ‘फ्लेक्स’ इंजिन तीन महिन्यांत; इंधनात ३० ते ३५ रुपयांची बचत होणार?
तेव्हा वज, आजारपण आठवलं नाही
कोरोना लॉकडाऊनच्या काळात मुंबई नागपूर विशेष विमान फेऱ्या सुरू होत्या तेव्हा वय, आजारपण हे अनिल देशमुख यांना आठवत नव्हतं आता मुंबईतून ईडी कार्यालयात जायचं म्हटलं की वय, आजार आठवयाला लागले, असा टोला केशव उपाध्ये यांनी लगावला आहे.
व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे जबाब नोंदवण्याची तयारी
प्रत्यक्ष चौकशीऐवजी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आपला जबाब नोंदवण्याची तयारी त्यांनी दाखवली आहे. अनिल देशमुख यांनी अंमलबजावणी संचलनालयाच्या अधिकाऱ्यांना पत्र लिहून आपली बाजू मांडली आहे. अनिल देशमुख यांच्या या भूमिकेनंतर ईडीने पुन्हा त्यांना निरोप धाडला आहे. चौकशीसाठी कार्यालयात २४ तासांत हजर राहा, अन्यथा घरी येऊन चौकशी करणार, असे ईडीने अनिल देशमुख यांना म्हटले आहे.
दरात मोठी घसरण! हॉलमार्किंग सोन्याचा भाव ४६ हजारांवर; चांदीही झाली स्वस्त
दरम्यान, ईडीने २५ जूनला समन्स बजावून मला दुसऱ्या दिवशी चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिले होते. ईसीआयआरमध्ये उल्लेख केलेली कागदपत्रं मी प्रतिनिधींकडून पाठवत आहे. मी स्वतः चौकशीसाठी हजर राहू शकणार नाही. माझे वय ७२ वर्ष आहे, आजारपण आणि कोरोना होण्याच्या धोक्यामुळे हजेरी लावू शकत नाही. त्याऐवजी माझा जबाब ऑनलाईन रेकॉर्ड करा. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे जबाब नोंदवेन. मात्र त्याआधी ईडीने प्रश्नांची कॉपी पाठवावी, अशी मागणी अनिल देशमुखांनी पत्राद्वारे केली आहे.