शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

जाऊ द्या ना ताई... नाहीतर ट्रकभर एसआयटी चौकशा कराव्या लागतील, आशिष शेलारांचा सुप्रिया सुळेंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2021 11:30 AM

Ashish shelar on Supriya Sule : आपल्याला अनेक प्रकरणांची एसआयटी चौकशी करावी लागेल, नवी मुंबईत भाजपच जिंकणार, शेलार यांनी व्यक्त केला विश्वास

ठळक मुद्देआपल्याला अनेक प्रकरणांची एसआयटी चौकशी करावी लागेल, शेलार यांचं वक्तव्यनवी मुंबईत भाजपच जिंकणार, शेलार यांनी व्यक्त केला विश्वास

गुंडांबाबत काही समस्या असल्यास कधीही फोन करा. मला इंटरनॅशनल डॉन ओळखतात, असं वक्तव्य करणारे भाजपचे नेते गणेश नाईक यांची एसआयटी चौकशी करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी नवी मुंबईत केली. वाशी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाचे उद्‌घाटन त्यांच्या हस्ते पार पडले. त्यानंतर आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं होतं. यानंतर भाजप नेते आशिष शेलार यांनी जोरदार टोला लगावला. "गणेश नाईक यांनी भाषणातील विधानाची एसआयटी चौकशी करायची तर मग, तसे बरेच विषय आहेत. आझाद काश्मीरचा बोर्डवाली मेहक प्रभू, शर्जिल, त्याला पळून जायला मदत करणारे, पूजा चव्हाणचा मृत्यू अशा ट्रकभर एसआयटी चौकशा कराव्या लागतील. जाऊ द्या ना ताई! नवी मुंबईत भाजप जिंकणार हे जनतेनेच ठरवलंय," असं म्हणत शेलार यांनी सुप्रिया सुळे यांना टोला लगावला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून सुप्रिया सुळेवर निशाणा साधला.काय म्हणाल्या होत्या सुप्रिया सुळे?महाराष्ट्रातील एखाद्या आमदाराचे संबंध अशा लोकांशी असतील आणि त्याची जाहीर कबुली ते भरसभेत देत असतील, तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांची तातडीने चौकशी लावावी, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली. तसंच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पारदर्शकपणे महाराष्ट्रातील जनतेला याचं उत्तर द्यावं. कारण नागरिकांची सुरक्षा ही माझी नैतिक जबाबदारी आहे, असं सुळे म्हणाल्या.आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांना ओळखणाऱ्या या नेत्यामुळे देशातील आणि नवी मुंबईतील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. येत्या संसदेच्या अधिवेशनात हा विषय मांडणार असून नाईक यांच्या चौकशीसाठी पाठपुरावा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. साधारण पंधरवड्यापूर्वी एका सभेत नाईक यांनी या आशयाचं वक्तव्य केलं होतं. या ठिकाणचे जे नेते ज्या शाळेत शिकतात त्या शाळेचा मी प्रिन्सिपल असल्याचे नाईक म्हणाले होते. 

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेAshish Shelarआशीष शेलारBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसNavi Mumbaiनवी मुंबईGanesh Naikगणेश नाईकAmit Shahअमित शहाParliamentसंसद