महाविकास आघाडीला राजकारणाचा महारोग जडलाय, केवळ त्यावरच लक्ष; शेलार यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2021 03:52 PM2021-05-25T15:52:06+5:302021-05-25T15:53:53+5:30

कोरोना आणि बालकांच्या चिंतेच्या काळात १२ आमदारांची आठवण कशी येते?, शेलार यांचा सवाल.

bjp leader ashish shelar slams mahavikas aghadi sanjay raut 12 mla name suggestion bhagatsingh koshyari | महाविकास आघाडीला राजकारणाचा महारोग जडलाय, केवळ त्यावरच लक्ष; शेलार यांची टीका

महाविकास आघाडीला राजकारणाचा महारोग जडलाय, केवळ त्यावरच लक्ष; शेलार यांची टीका

Next
ठळक मुद्देकोरोना आणि बालकांच्या चिंतेच्या काळात १२ आमदारांची आठवण कशी येते? शेलार यांचा सवाल.संजय राऊत यांच्यावरही साधला निशाणा.

"कोरोनाच्या काळात १२ आमदारांचा विषय कुठून आला? कोरोनाच्या पार्शवभूमीवर कोणत्याही निवडणुकीचं काम केलं तर त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचं सरकार जबाबदार धरता. आज कोरोनाच्या काळात आणि बालकांच्याही चिंतेच्या काळात यांना १२ आमदारांची आठवण कशी येते? महाविकास आघाडी सरकारचं केवळ राजकारणावर लक्ष आहे.  यांना राजकारणाचा महारोग जडला आहे," अशी टीका भाजपा नेते आमदार अॅड. आशिष शेलार यांनी केला. भाजप प्रदेश कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधताना विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. 

शेलार यांनी यावेळी खा. संजय राऊत यांच्या टीकेचाही समाचार घेतला. "भूत आणि भूताटकी ही नेमकं कसली वक्तव्य आहेत? रोज नुसतं १२-१२ ची टिमकी वाजवली जातेय. तुमचे काय १२ वाजलेत का? भुतानं जर फाइल पळवल्याचं तुमचं म्हणणं असेल तर मी सांगू इच्छितो की भाजप काहीही आज करत नाहीये. पण भाजपनं जर एक डाव भुताचा टाकला तर तुम्हाला खूप भारी पडेल हे राऊत यांनी लक्षात ठेवावं," असा जोरदार टोलाही शेलार यांनी लगावला.

बार्ज दुर्घटना प्रकरणी शापूरजी पालनजीवर गुन्हा दाखल करा

अखिल भारतीय नाविक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार अँड आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली आज येलो गेट पोलीस स्टेशनमध्ये जाऊन  एफकाँन्सचे संचालक मंडळ आणि शापूरजी पालनजी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा अशी तक्रार त्यांनी केली. "या प्रकरणात शापुरजी पालनजी यांच्या संचालकना वाचवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. राज्यातील कुठला मंत्री त्यासाठी प्रयत्न करीत आहे?," असा सवालही शेलार यांनी केला. "या प्रकरणी कंपनीच्या अध्यक्षांवर का वर गुन्हा नाही. जो हजर नाही, आपली बाजू मांडू शकत नाही अशा कॅप्टनवर गुन्हा दखल केला गेला. हा डाव कुठल्या मजल्यावर शिजला हे मुख्यमंत्री सांगावे," असा आरोप ही त्यांनी केला आहे.

Web Title: bjp leader ashish shelar slams mahavikas aghadi sanjay raut 12 mla name suggestion bhagatsingh koshyari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.