शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
4
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
5
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
6
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
18
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
19
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
20
शिमला कराराने सुटलेले भारत-पाकिस्तानमधील वाद; आता पाक देतोय रद्द करण्याची धमकी...

".. पण आंदोलनकर्त्यांना १० एकरात १०० कोटींची वांगी लावण्याचा मंत्र मात्र न चुकता द्या"

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2021 20:43 IST

भाजप नेत्याचा सुप्रिया सुळेंना टोला

ठळक मुद्देसीमेची दृश्य पाहून आपण भारतातच राहतो का असा प्रश्न पडल्याचं म्हणाल्या होत्या सुप्रिया सुळेपोलिसांनी नाकारली होती आंदोलकांची भेट

दिल्लीच्या सीमारेषेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला जगभरातून पाठिंबा मिळत आहे. विदेशातील काही लोकांनीही ट्वीट करुन या आंदोलनाला समर्थन दिलं होतं. तर, देशातील विविध राजकीय पक्षाचे नेतेही सीमारेषेवर जाऊन शेतकरी आंदोलकांची, शेतकरी नेत्यांची भेट घेत आहेत. शिवसेना नेते संजय राऊत यांनी दोन दिवसांपूर्वी दिल्लीच्या सीमेवर जाऊन शेतकरी नेते राकेश टिकैत यांची भेट घेतली होती. आता, राष्ट्रवादीच्या नेत्या आणि  खासदार सुप्रिया सुळेंनी गाझीपूर सीमेवर भेट दिली. मात्र, पोलिसांनी आंदोलक शेतकऱ्यांना भेटू दिले नाही. त्यामुळे, आपण नक्की भारतातच राहतो का? असा प्रश्न त्यांनी विचारलाय होता. यावरून आता भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधला."आपल्या तीर्थरुपांना जे कायदे करायचे मनात होते पण जमले नाही. ते कायदे मोदी सरकारनं करून दाखवले. तरीही विरोधासाठी विरोध करायचा असेल तर गाझीपूर सीमेवर आंदोलनकर्त्याना भेटण्यासाठी जरूर जा. परंतु तिथे त्यांना १० एकरात १०० कोटीची वांगी लावण्याचा मंत्र मात्र न चुकता द्या," असं म्हणत भातखळकर यांनी सुप्रिया सुळे यांना टोला लगावला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून सुप्रिया सुळेंवर टीका केली.काय म्हणाल्या सुप्रिया सुळे ?गाझीपूर सीमेवर विरोधकांचं शिष्टमंडळ पोहोचलं होतं. या शिष्टमंडळात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंसह अनेक पक्षांचे नेते आणि खासदार उपस्थित होते. राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे, अकाली दलाचे नेते व माजी मंत्री हरसिमरत कौर, डी.एम.के. पक्षाच्या कनिमोझी, तृणमूल काँग्रेसच्या सौगत रॉय आदी नेत्यांचा समावेश होता. काँग्रेस शिवाय जवळपास १० विरोधी पक्षाचे १५ पेक्षा अधिक नेते पोहचले होते. मात्र, दिल्ली पोलिसांनी या नेत्यांना शेतकऱ्यांची भेट घेऊ दिली नाही. त्यानंतर, सुप्रिया सुळेंनी आपल्या ट्विटरवरुन प्रश्न विचारला होता.गाझीपूर सीमेवर दिल्ली येथे गेली ७० दिवस आंदोलन करीत असलेल्या शेतकरी बांधवांना भेटण्यासाठी आम्ही काही खासदार गेलो होतो. परंतु आम्हाला त्यांना भेटू दिले नाही. गाझीपूर सीमेचे दृश्य पाहून आपण नक्की भारतातच राहतो का असा प्रश्न पडला. आपल्या संस्कृतीत 'अन्नदाता सुखी भव' असा उल्लेख आहे.पण केंद्र सरकार अन्नदात्या शेतकऱ्यांना अशी अमानुष वागणूक देत आहे, हे निषेधार्ह आहे, असं ट्वीट सुप्रिया सुळेंनी केलं होतं.

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाAtul Bhatkalkarअतुल भातखळकरTwitterट्विटरSanjay Rautसंजय राऊतrakesh tikaitराकेश टिकैतFarmers Protestशेतकरी आंदोलन