शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
2
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत कोणता मुद्दा यावेळी ठरणार निर्णायक?
3
पती-पत्नीला एकमेकांच्या हेरगिरीची परवानगी नाही, मद्रास व हिमाचल हायकोर्टाचे मत
4
'ऑलिम्पिक २०३६'च्या आयोजनास सज्ज, भारताने आयओसीकडे सोपविले आशय पत्र
5
'टीम इंडिया ऑस्ट्रेलियात ४-० ने जिंकणार नाही...', सुनील गावसकर यांचे धक्कादायक भाकीत
6
रणजी क्रिकेट: पृथ्वी शॉ याला मुंबईच्या संघात स्थान नाहीच, श्रेयसचं पुनरागमन
7
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
8
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
9
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
11
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
12
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
13
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
14
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
16
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
17
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
18
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
19
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
20
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...

"बापजाद्यांच्या पुण्याईवर सत्ता मिळवणारे सुमार राज्यकर्ते रोज मोदींच्या नावानं बोटं मोडतायत"

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2021 3:29 PM

भाजप नेत्याची जोरदार टीका

ठळक मुद्देभाजप नेत्यानं विरोधकांना लगावला टोलास्टेडियमला नरेंद्र मोदी यांचं नाव दिल्यानंतर विरोधकांनी केली होती टीका

गुजरातमधील जगातील सर्वात मोठ्या आणि अत्यeधुनिक क्रिकेट स्टेडियमच्या नावावरून वाद सुरू आहे. गुजरातमधील अहमदाबाद येथे असलेल्या मोटेरा स्टेडिअमला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव देण्यात आलं आहे. गृहमंत्री अमित शाह यांनीदेखील नरेंद्र मोदी यांचं हे स्वप्न असून प्रत्यक्षात ते साकार झाल्यानं त्यांचं नाव स्टेडिअमला दिल्याचं म्हटलं होतं. दरम्यान, अनेकांनी यावरून माजी पंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांच्याशी तुलना होत असल्याचा आरोपही केला. यावरून भाजप नेते अतुल भातखळकर यांनी विरोधकांना जोरदार टोला लगावला आहे. "सरदार पटेलांशी पंतप्रधान मोदींची तुलना करण्याचा प्रश्नच नाही. पण पटेलांप्रमाणे मोदींचा भारतातल्या नवं संस्थानिकांनी धसका घेतलाय हे खरे आहे. बापजाद्यांच्या पुण्याईवर सत्ता मिळवणारे सुमार राज्यकर्ते रोज मोदींच्या नावाने बोटे मोडतायत," असं म्हणत भातखळकर यांनी जोरदार टीका केली. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून विरोधकांना टोला लगावला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ज्या स्टेडियमचे उद्घाटन करण्यात आलं त्या स्टेडियमला आधी सरदार पटेलांचे नाव देण्यात आले होते. मात्र, आता या स्टेडियमचे नाव पंतप्रधानांच्या नावानं म्हणजेच नरेंद्र मोदी स्टेडियम करण्यात आले आहे. यामुळेच काँग्रेसने भाजप आणि पंतप्रधानांना निशाण्यावर घेतले आहे.स्टेडियमला का दिलं नरेंद्र मोदींचं नाव? काँग्रेस नेते याला सरदार पटेलांचा अपमान असल्याचे म्हणत आहेत, तर केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी यासंदर्भात बोलताना म्हटले आहे, की "आम्ही या स्टेडियमचे नाव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हा मोदींचा एक ड्रिम प्रोजेक्ट होता. गुजरातचे मुख्यमंत्रीपद भूषवत असताना त्यांनी हे स्पप्न पाहिले होते. जे आता साकार झाले आहे. नवे स्टेडियमला जगातील सर्वात मोठ्या आणि सर्वात हायटेक स्टेडियमच्या धर्तीवर उभारण्यात आले आहे. अहमदाबाद आता स्पोर्ट्स सिटीच्या नावानेही ओळखले जाईल."

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीAtul Bhatkalkarअतुल भातखळकरBJPभाजपाNarendra Modi Stadiumनरेंद्र मोदी स्टेडियमAmit Shahअमित शहाRamnath Kovindरामनाथ कोविंद