पुणे : जिल्ह्यातील शिरूर येथे धक्कादायक घटना घडली आहे. याठिकाणी कपाऊंडर बोगस डॉक्टर बनून २ वर्षापासून २२ बेडचं हॉस्पिटल चालवत होता. एवढंच नाही तर त्यानं कोविड रुग्णांसाठी स्पेशल वार्डही बनवला होता. ज्यात कोरोना रुग्णांवर उपचार सुरू होते. हा कंपाऊंडर डॉक्टरकीचं बनावट डिग्री आणि नावानं लोकांची फसवणूक करत असल्याचं उघड झालं आहे. दरम्यान, यावरुन भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी जोरदार टोला लगावला आहे. "पुणे जिल्ह्यात बनावट डिग्रीच्या मदतीने एक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चालविण्याचा पराक्रम या दोन वर्षापासून एका कंपाऊंडरने केला. कोरोना रुग्णांवरदेखील त्या हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले होते. संजय राऊतांच्या विधानाचा प्रेरणास्रोत हाच असावा बहुधा," असं म्हणत भातखळकर यांनी राऊतांना टोला लगावला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून निशाणा साधला.
पुण्यात कंपाऊंडर बनला डॉक्टर; भाजप नेते म्हणाले, "संजय राऊतांच्या विधानाचा प्रेरणास्त्रोत हाच असावा बहुधा"
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2021 5:33 PM
कंपाऊंडरनं सुरू केलं होतं २२ बेड्सचं रुग्णालय. रुग्णालयात सुरू होती कोरोनाबाधितांवर उपचार, धक्कादायक बाब आली समोर
ठळक मुद्दे कंपाऊंडरनं सुरू केलं होतं २२ बेड्सचं रुग्णालय.रुग्णालयात सुरू होती कोरोनाबाधितांवर उपचार, धक्कादायक बाब आली समोर