शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
तेलंगणा सरकारने अदानी समूहाची १०० कोटींची देणगी नाकारली, कारण...
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
4
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
5
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
6
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
7
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
8
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
9
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
10
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
11
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
12
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
13
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
14
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
15
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
16
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
17
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
18
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
19
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
20
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."

"...तर भाजपासमोर यांचा निभावही लागणार नाही", चंद्रकांत पाटलांचे सत्ताधारी पक्षांना आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2021 12:44 PM

BJP Leader Chandrakant Patil : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक निकाल आणि पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणूक निकलाच्या अनुषंगाने चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला थेट आव्हान दिले आहे.

ठळक मुद्देसत्ताधारी महाविकास आघाडीडून होत असलेल्या टीकेला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

मुंबई : पश्चिम बंगालमध्ये किमान २०० जागा जिंकून सरकार स्थापण्याचे भाजपाचे प्रयत्न हाणून पाडताना मतदारांनी बंगालची सत्ता पुन्हा ममता बॅनर्जी यांच्या हाती तर दिलीच, पण तृणमूल काँग्रेसच्या २१५ उमेदवारांना विजयी करताना भाजपाला १०० जागाही मिळू दिल्या नाहीत.पश्चिम बंगालच्या या निकालाची सध्या देशभरात चर्चा सुरू आहे. या निकालवरून राज्यातील महाविकास आघाडी भाजपाला लक्ष्य करताना दिसत आहे. सत्ताधारी महाविकास आघाडीडून होत असलेल्या टीकेला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. (BJP Leader Chandrakant Patil Criticizes Maha Vikas Aaghadi on Pandharpur bypoll result)

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक निकाल आणि पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणूक निकलाच्या अनुषंगाने चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला थेट आव्हान दिले आहे. यासंदर्भात चंद्रकांत पाटील यांनी एक ट्विट केले आहे. "महाराष्ट्रात माझे आव्हान आहे, कोणत्याही निवडणुकीत चारही पक्षांनी वेगवेगळं लढून पाहावं, मग सर्वांना कल्पना येईल की कोणाला किती बोलण्याची पात्रता आहे. तीनही पक्ष एकत्रित असून, सुद्धा पंढरपुरात आमचा पराभव करू शकले नाहीत, मग हे वेगवेगळे लढले, तर भाजपासमोर यांचा निभावही लागणार नाही," असे ट्विटद्वारे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाला यशपंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाचे समाधान आवताडे हे महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांचा ३,७३३ मतांनी पराभव करून  विजयी झाले.  पंढरपूर विधानसभा मतदारसंघाच्या इतिहासात पहिल्यांदाच कमळ फुलले आहे. राष्ट्रवादीचे आमदार दिवंगत भारत भालके यांच्या आकस्मिक निधनामुळे पंढरपूर- मंगळवेढ्याची पोटनिवडणूक लागली होती. राष्ट्रवादीकडून त्यांचे पुत्र  भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली. भाजपने समाधान आवताडे यांना उमेदवारी दिली.

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीच्या पराभवाची 'ही' आहेत कारणे राष्ट्रवादीत निवडणुकीअगोदर पदाधिकारी निवडीवरून सुरू असलेला गोंधळ, विठ्ठल कारखान्याची मागील काही वर्षांपासून असलेली बिकट आर्थिक अवस्था, भगीरथ भालके यांचा कमी असलेला जनसंपर्क, मागील काही दिवसांमध्ये महाविकास आघाडीकडून शेतकऱ्यांचे कट करण्यात आलेले वीज कनेक्शन, कर्जमाफी, अनुदान, विठ्ठल बळकावण्याचा भाजपकडून केलेला प्रचार यानंतर अजित पवार, जयंत पाटील यांच्यासह इतर मंत्री, खासदार, आमदारांनी प्रचार करूनही ही जागा महाविकास आघाडीला राखण्यात अपयश आले.

पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकालगेल्या महिन्यात देशातील पाच राज्यांत विधानसभेच्या निवडणुका झाल्या. तसेच काही पोटनिवडणुकांचे निकाल रविवारी जाहीर झाले. त्यातून तामिळनाडू व पुदुच्चेरी वगळता कुठेही सत्ताबदल झालेला नाही. तामिळनाडूमध्ये सत्ताधारी अण्णा द्रमुकच्या पराभव  द्रमुक व काँग्रेस आघाडीने केला आहे. तिथे भाजपाने अण्णा द्रमुकशी युती केली होती. द्रमुक व मित्रपक्षांना १४८ तर अण्णा द्रमुक व भाजपा यांना मिळून ८३ जागांवर विजय मिळाला आहे. तर पुदुच्चेरीमध्ये मात्र एआयएनआरसी या मित्र पक्षाच्या साह्याने भाजपाला सरकारमध्ये जाता येईल. तेथील एकूण ३० पैकी १३ जागा भाजपा व मित्रपक्षाला मिळाल्या आहेत. त्यामुळे तिथे अपक्षांची मदत घ्यावी लागेल. 

(Mamata Banerjee: सरकार स्थापन करणार की राजीनामा देणार? ममता बॅनर्जी राज्यपालांच्या भेटीला जाणार)

गेली पाच वर्षे सत्तेत असलेल्या आसाममध्ये मात्र भाजपाच पुन्हा सरकार स्थापन करेल. तेथील १२७ पैकी ७६ जागा भाजपा व मित्र पक्षांनी जिंकल्या आहेत. तिथे आपण सत्तेत येऊ, असे काँग्रेसला वाटत होते. त्यासाठी स्थानिक पक्षांनाही सोबत घेतले होते. पण मतदारांनी काँग्रेस व मित्रपक्षांचे ४८ उमेदवारच विधानसभेत पाठविले आहेत. तर पश्चिम बंगालमध्ये किमान २०० जागा जिंकून सरकार  स्थापण्याचे भाजपचे प्रयत्न हाणून पाडताना मतदारांनी  बंगालची सत्ता पुन्हा ममता बॅनर्जी यांच्या हाती तर दिलीच, पण तृणमूल काँग्रेसच्या २१५ उमेदवारांना विजयी करताना भाजपला १०० जागाही मिळू दिल्या नाहीत.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपाPandharpur By Electionपंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक निकाल 2021ElectionनिवडणूकNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसShiv Senaशिवसेना