मुंबई – भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे. राज्य सरकारकडून एका खासगी संस्थेला जनसंपर्कासाठी नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर भाजपाने आक्षेप घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. उद्धवजी, आतातरी जनतेची दिशाभूल करणं सोडा अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना चिमटा काढला आहे.
याबाबत चंद्रकांत पाटील म्हणाले की, महाराष्ट्र शासनाने एका खाजगी संस्थेला स्वतःच्या जनसंपर्कासाठी नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यासाठी काही दिवसांपूर्वी सुमारे ६ कोटी रुपयांचे टेंडर काढले आहे. राज्य सरकारला असे वाटत आहे की जनतेचा त्यांच्याविषयी असलेला दृष्टिकोन बदलण्यात त्या संस्थेने मदत करावी. म्हणजे सरळ सरळ जनतेची दिशाभूल करून त्यांना चुकीच्या दिशेने नेण्यास परावृत्त करावे असा आरोप त्यांनी केला आहे.
उद्धव ठाकरे सरकारची डोकेदुखी वाढणार; मराठापाठोपाठ धनगर समाजही राज्यभर आंदोलन करणार
तसेच त्या सहा कोटींमध्ये २५ ते ३० हजार लोकांच्या कोरोना चाचण्या झाल्या असत्या हा तरी विचार राज्य सरकारने करायला हवा होता, उद्धवजी, तुमची प्रतिमा चांगली वाईट कशीही असो, या कठीण काळात कमीत कमी महाराष्ट्राची प्रतिमा मलीन होणार नाही याची तरी काळजी घ्या असंही आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. त्याचसोबत जर हे पैसे खर्च करायचेच आहेत तर ते जनतेमध्ये कोरोनाविरुद्ध लढा देण्यासाठी जागरूकता निर्माण करण्यासाठी खर्च करायला हवेत. तुमची ओळख तेव्हाच सुधारेल जेव्हा तुम्ही केवळ जनसंपर्क नाही तर खऱ्या अर्थाने जनहितार्थाचे कर्तव्य पार पाडाल असा चिमटाही पाटलांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना काढला आहे.
उद्धव ठाकरे, आदित्य अन् सुप्रिया सुळेंच्या अडचणी वाढणार?; निवडणूक प्रतिज्ञापत्राची चौकशी होणार
ठाकरे ब्रँडवरुनही चंद्रकांत पाटलांनी केली होती टीका
महाराष्ट्रात ठाकरे ब्रँड? हे काय नवीन काढलं? असा सवाल करत महाराष्ट्रात फक्त छत्रपती शिवाजी महाराज हेच ब्रँड आहेत. त्याशिवाय कोणताच ब्रँड नाही, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं. ठाकरे ब्रँड? हे काय नवीन काढलं? शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल आमच्या मनात आदर आहे. महाराष्ट्रात फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचाच ब्रँड आहे. त्यांच्याशिवाय दुसरा कोणताच ब्रँड नाही, असं पाटील यांनी सांगितलं. तसेच, यावरुन मनसेच्या एका नेत्यानं शिवसेनेला उत्तर दिलंय याची आठवणही पाटील यांनी करुन दिली होती.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
केंद्र सरकारचा कर्मचाऱ्यांना मोठा झटका; आता पूर्वपरवानगीशिवाय कंपन्या करु शकणार कपात
“सरकारविरोधात द्रोह करणाऱ्या ‘त्या’ पोलीस अधिकाऱ्यांची नावं सांगा, अन्यथा आंदोलन करु”
गृहमंत्री अनिल देशमुखांनी शरद पवार यांच्याकडून धडे घ्यावेत; भाजपा आमदाराचा टोला
एका अफवेमुळे केंद्रीय मंत्र्यांनी राजीनामा दिलाय का?; खासदार संजय राऊतांचा पंतप्रधानांना प्रश्न
टाटा ग्रुपनं बनवली कोरोना 'फेलुदा' टेस्ट किट; कमी खर्चात लवकरात लवकर देणार अचूक अहवाल