मुंबई: आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Cm Uddhav Thackeray ) स्वत: त्यांची गाडी चालवत मुंबईवरुन पंढरपूरला(Pandharpur) गेले होते. त्यावरुन मुख्यमंत्र्यांना अपघातग्रस्तांकडे यायला वेळ नाही, पण पंढरपूरला जायला वेळ आहे, अशी विरोधकांकडून टीकाही झाली होती. त्यानंतर आता भाजप नेत्या चित्रा वाघ(Chitra Wagh) यांनीही मुख्यमंत्र्यांवर तोंडसुख घेतलयं.
महाराष्ट्राच्या अनेक भागांत मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आला आहे. रायगड, रत्नागिरीत, चिपळुनमध्ये पुराने हाहाकार माजवला आहे. गावच्या गावं पाण्याखाली गेल्याने नागरिकांसमोर मोठं संकट उठं टाकलं आहे. इतकी भीषण परिस्थिती असतानाही मुख्यमंत्र्यांनी अजून कोकणाचा दौरा केला नाही. त्यावरुन चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी, तुमच्या ड्रायव्हिंग कौशल्याची खरी गरज आता आहे… ड्रायव्हिंग करत आपण कोकणात जाणार आहात का?', असा सवाल चित्रा वाघ यांनी विचारला आहे.
कोकणात पावसाचा धुमाकूळसंपूर्ण कोकणासह मध्य महाराष्ट्राला गुरुवारी अतिवृष्टीने झोडपल्यानंतर आता शुक्रवारीदेखील येथे पावसाचा जोर कायम राहणार आहे. भारतीय हवामान विभागाकडील माहितीनुसार, शुक्रवारीदेखील कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २३ जुलै रोजी मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर नाशिक, औरंगाबाद, जळगाव, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, अकोला आणि नागपूर या जिल्ह्यांत सर्वसाधारण पावसाची शक्यता आहे.