शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
3
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
4
"बटेंगे तो कटेंगे भाषा महाराष्ट्रात नाही चालणार"; सुप्रिया सुळेंचे भाजपवर टीकास्त्र
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

"शरद पवारांनी अर्धसत्य सांगितलं"; फडणवीसांनी सांगितला 'त्या' घटनेचा पुढील भाग

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2021 3:07 PM

bjp leader devendra fadnavis slams thackeray government over param singh letter and anil deshmukh: गृहमंत्रालय नेमकं कोण चालवतं? अनिल देशमुख की अनिल परब?; फडणवीसांचा सवाल

नागपूर: मुंबई पोलीस आयुक्त पदावरून हटवण्यात आलेल्या परमबीर सिंग (Param Bir Singh) यांनी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांमुळे राज्यात खळबळ माजली आहे. देशमुख यांनी सचिन वाझेंना (Sachin Vaze) दर महिन्याला १०० कोटी गोळा करण्याचं टार्गेट दिलं होतं, असा सनसनाटी आरोप करणारं पत्र सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना (CM Uddhav Thackeray) लिहिलं आहे. यामुळे देशमुख यांच्यासह ठाकरे सरकारदेखील अडचणीत आलं असून विरोधकांनी हल्लाबोल केला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात पत्रकार परिषद घेऊन सरकारवर हल्लाबोल केला आहे.आधी पत्र येतं, मग लगेच फडणवीस येतात; काँग्रेसनं सांगितली 'लेटर बॉम्ब'मागची स्क्रिप्टपोलीस दलातील, गृह विभागातील गैरप्रकारांवर बोलणारे परमबीर सिंग हे काही पहिले अधिकारी नाहीत. याआधी सुबोध जैस्वाल, रश्मी शुक्ला यांनीदेखील बदल्यांच्या रॅकेटबद्दल आवाज उठवला होता. पण ठाकरे सरकारनं त्यांच्या पत्राची दखल घेतली नाही. तशी दखल घेतली असती, तर आज ही वेळ आली नसती, असं फडणवीस म्हणाले.गृहमंत्री अनिल देशमुखांचा राजीनामा घेणार का? शरद पवारांनी केले मोठे विधान, म्हणाले...शरद पवारांनी आज घेतलेली पत्रकार परिषद ऐकून मला आश्चर्य वाटलं, असं फडणवीस यांनी म्हटलं. 'शरद पवार या सरकारचे निर्माते आहेत. त्यामुळे सरकारनं काहीही केलं तरीही त्यांना बचाव करावा लागतो. निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेंना परमबीर सिंग यांनी पुन्हा सेवेत घेतलं हे खरं आहे. पण हे अर्धसत्य आहे. शरद पवारांनी अर्धसत्य सांगितलं. परमबीर सिंग यांनी निर्णय घेतल्यानंतर ठाकरे सरकारनं आक्षेप का नोंदवला नाही? त्यावेळी सरकार झोपलं होतं का?,' असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.मुंबई पोलिसांना १०० कोटींच्या वसुलीचं टार्गेट, शरद पवार हसले आणि म्हणाले...परमबीर सिंग यांनी वाझेंना पुन्हा पोलीस दलात रुजू करून घेतलं हे खरं आहे. पण अशा प्रकारे सेवेत घेण्यात आलेल्या अधिकाऱ्यांना कार्यकारी पद दिलं जात नाही. मुख्यमंत्री ठाकरे आणि गृहमंत्री देशमुख यांना नियम माहीत नाहीत का? सरकारच्या आशीर्वादाशिवाय वाझेंना इतकं महत्त्वाचं पद मिळू शकत नाही. सरकारचा वरदहस्त असल्यानंच वाझेंकडे अनेक महत्त्वाच्या प्रकरणांचा तपास सोपवला गेला, असा दावा त्यांनी केला.गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तातडीनं मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा. त्यांनी पद सोडल्याशिवाय त्यांची निष्पक्षपणे चौकशी होऊ शकत नाही. त्यामुळे त्यांचा तातडीनं राजीनामा घेतला जावा. परमबीर सिंग यांनी त्यांच्याच पत्रात उल्लेख केलेलं पोलीस अधिकाऱ्यांसोबतच संभाषण हा महत्त्वाचा पुरावा आहे. हे चॅट त्यांना पदावरून दूर करण्यापूर्वीच आहे. त्यामुळे हा पुरावा अतिशय महत्त्वाचा आहे, असा दावा फडणवीस यांनी केला आहे.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAnil Deshmukhअनिल देशमुखParam Bir Singhपरम बीर सिंगUddhav Thackerayउद्धव ठाकरेsachin Vazeसचिन वाझे