मुंबई: महाविकास आघाडीबद्दल काँग्रेसच्या मंत्र्यांचं काय मत आहे याकडे आम्ही लक्ष देणार नाही. जो पक्ष स्वत:चा अध्यक्ष ठरवू शकत नाही, तो पक्ष पुढचे निर्णय काय घेणार, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. राज्य सरकारमधील कुरबुरी, काँग्रेसची नाराजी, राष्ट्रीय अध्यक्षपदावरून सुरू असलेला वाद यावरून फडणवीसांनी काँग्रेसला लक्ष्य केलं. काँग्रेसच्या अध्यक्षपदाबद्दल सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. भावी अध्यक्ष गांधी कुटुंबातील असावा की बाहेरील, यावरून पक्षात दोन गट पडले आहेत. देशभरातील काँग्रेसचे नेतेही त्यांची मतं मांडत आहेत. महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेतेही यात मागे नाहीत. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, महिला बालविकास मंत्री यशोमती ठाकूर आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राहुल गांधी यांच्या नावाला ठाम पाठिंबा दिला आहे. वडेट्टीवार यांनी तर त्यांच्याही पुढे जाऊन अध्यक्ष झाल्यानंतर राहुल गांधी यांनी सांगितल्यास राज्यातील सत्ताही सोडू, असं विधान केलं आहे. त्यामुळे राज्यातील सरकारच्या स्थिरतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं.वडेट्टीवारांच्या विधानाबद्दल प्रश्न विचारला असता, या सगळ्याकडं आता आम्ही फार लक्ष देत नाही. एका अध्यक्षपदावरून त्यांच्यात इतके वाद सुरू आहेत. सोनिया गांधींना अध्यक्षपदी राहायचं नाही. पण त्यांनाच राहावं लागतं आहे. जे अध्यक्ष पदाचा निर्णय घेऊ शकत नाहीत, ते पुढचे निर्णय कसे घेणार?, असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला. इतक्या मोठ्या पक्षाची अशी अवस्था का झाली याचं आत्मचिंतन करायला हवं, असंदेखील ते म्हणाले.महाविकास आघाडी सरकार ही अनैसर्गिक आघाडी आहे. त्यांच्यात खूप अंतर्विरोध आहे. त्यामुळे सरकार जितके दिवस चाललंय, तितके दिवस चालेल आणि एक दिवस जाईल. ही आघाडी नैसर्गिक नाही. अशी आघाडी देशाच्या राजकारणात फार काळ कधीच चाललेली नाही, असं फडणवीस यांनी म्हटलं.वीरप्पा मोईली म्हणाले, सोनिया गांधी आम्हाला मातेसमान, पण...पिक्चर अभी बाकी है! काँग्रेसमधील घमासान सुरू; कपिल सिब्बल यांचं सौम्य, पण सूचक ट्विटसोनिया गांधीच काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष; कार्यकारिणीचे शिक्कामोर्तब
जो पक्ष स्वत:चा अध्यक्ष ठरवू शकत नाही, तो पुढचे निर्णय काय घेणार?; फडणवीसांचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2020 1:44 PM