मुंबई: शिवसेना नेते आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयांवर सक्तवसुली संचलनालयानं (ईडी) टाकलेल्या छाप्यांमुळे राज्यातलं राजकारण ढवळून निघालं आहे. ईडीच्या धाडींमुळे माझं तोंड बंद होणार नाही, असा आक्रमक पवित्रा सरनाईक यांनी घेतला होता. मात्र ईडीने आज चौकशीसाठी उपस्थित राहण्यासाठी समन्स बजावल्यानंतर प्रताप सरनाईक यांनी ईडीला विनंती केली आहे. आता नको तर पुढच्या आठवड्यात आपली एकत्रित चौकशी करावी, अशी विनंती प्रताप सरनाईक यांनी केली आहे.
सरनाईक यांचा आक्रमक पवित्राईडीच्या चौकशीनंतरही प्रताप सरनाईक यांनी आपला आक्रमक पवित्रा कायम ठेवला होता. ईडीनं धाड टाकली म्हणून तोंड बंद करणार नाही. फाशी दिली तरी ती स्वीकारायची तयार असल्याचं सरनाईक यांनी म्हटलं, होतं. ज्या दिवशी अर्णब गोस्वामी, कंगना रणौत यांच्यावर हक्कभंग दाखल केला, अन्वय नाईक प्रकरणाचा तपास पुन्हा सुरू करण्याची मागणी लावून धरली, त्याच दिवशी उद्या काय होणार याचा विचार केला होता. आम्ही संघर्ष करत इथपर्यंत पोहोचलो आहोत. शिवसेना आणि उद्धव ठाकरेंनी मला आमदार केलं. एका पक्षाचा लोकप्रतिनिधी म्हणून त्या पक्षाची धोरणं, भूमिका प्रसारमाध्यमांसमोर स्पष्ट करणं ही माझी जबाबदारी असल्याचं सरनाईक म्हणाले....म्हणून ईडीनं सरनाईकांच्या घरावर छापे टाकले; भुजबळांनी सांगितलं राज'कारण'
ईडीचे लोक माझ्या मुलांना तुमचे वडील कंगना, अर्णब, अन्वय नाईक प्रकरणावर खूप बोलत असल्याचं विचारत होते, असं प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. 'या देशात, राज्यात महाराष्ट्राची, मुंबई पोलिसांची बदनामी होत असेल तर अशा गोष्टींवर प्रताप सरनाईक बोलणार. ईडीचे छापे पडले म्हणून प्रताप सरनाईकचं तोंड बंद होणार नाही. महाराष्ट्रासाठी, देशासाठी, मुंबईसाठी फाशी दिली तरी ती स्वीकारायची तयारी आहे,' अशी आक्रमक भूमिका त्यांनी मांडली होती. 'त्या' १०० लोकांची यादी द्या, कारवाई होईल; फडणवीसांचा संजय राऊतांना 'शब्द'
'ईडीच्या लोकांनी माझं कार्यालय, घरी सगळीकडे चौकशी केली, कागदपत्रं ताब्यात घेतली. मी गेल्या ३० वर्षांपासून बांधकाम आणि हॉटेल व्यवसायात आहे. त्याची सर्व कागदपत्रं आहेत. ईडीच्या लोकांना माझे कर्मचारी, मुलं यांनी माहिती दिली आहे. मात्र त्यानंही त्यांचं समाधान झालेलं नाही. मला चौकशीला बोलावल्यास त्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्यास मी समर्थ आहे', असं प्रताप सरनाईक म्हणाले होते.