शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
4
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
5
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
6
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
18
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
19
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
20
शिमला कराराने सुटलेले भारत-पाकिस्तानमधील वाद; आता पाक देतोय रद्द करण्याची धमकी...

Maratha Reservation : मराठा मुख्यमंत्री असता तर न्यायालयाचा हा निर्णय अपेक्षित नसता - नारायण राणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2021 16:03 IST

Narayan Rane : भाजपा नेते आणि राज्यसभा खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनीही पत्रकार परिषद घेत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

ठळक मुद्देकाहींना आता वाटेल मराठा समाज संपला. मात्र, मराठा समाज अजून जिवंत आहे, आम्ही हा लढा सुरू ठेवू, असे म्हणत नारायण राणे यांनी काही लोकांचे खायचे आणि दाखवण्याचे दात वेगळे, हे समाजाने लक्षात घ्यावे, असे सांगितले.

मुंबई : महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या मराठा आरक्षणासंदर्भातसर्वोच्च न्यायालयाने आज मोठा निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारने पारित केलेला मराठा आरक्षणाचा कायदा रद्द ठरवला आहे. यावरून आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर विरोधकांकडून राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यात अपयशी ठरल्याची टीका सुरू केली आहे. दरम्यान, भाजपा नेते आणि राज्यसभा खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनीही पत्रकार परिषद घेत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. (BJP leader Narayan Rane alligations against Shivsena and CM Uddhav Thackeray on Maratha Reservation)

"सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय दुर्दैवी आहे. महाराष्ट्राच्या प्रगतीला खीळ घालणारा हा निर्णय असून मराठा समाजाला आरक्षण न मिळण्याला हे तीन पक्षाचे सरकार आणि मुख्यमंत्री कारणीभूत आहेत. राज्यात मराठा मुख्यमंत्री असता तर हा निर्णय अपेक्षित नसता", असा आरोप नारायण राणे यांनी केला आहे. याचबरोबर, "मराठा समाजाला आरक्षण मिळू नये, अशी शिवसेनेची आधीपासूनच भूमिका आहे, मी शिवसेनेत अनेक वर्ष असल्याने मला हे माहीत आहे. उद्धव ठाकरे यांना आरक्षणाविषयी काहीच माहिती नाही", अशी टीकाही नारायण राणे यांनी केली आहे.

(केंद्र सरकारने मराठा आरक्षणाला मान्यता मिळवून द्यावी - नवाब मलिक)

आपल्यावर अन्याय झाल्याची मराठा समाजाची भावना आहे. आमच्या समाजाला प्रगतीपासून वंचित ठेवणारा हा निर्णय आहे. इतर समाजाला आरक्षण मिळण्यात मराठा समाजाचा मोठा वाटा आहे. काहींना आता वाटेल मराठा समाज संपला. मात्र, मराठा समाज अजून जिवंत आहे, आम्ही हा लढा सुरू ठेवू, असे म्हणत नारायण राणे यांनी काही लोकांचे खायचे आणि दाखवण्याचे दात वेगळे, हे समाजाने लक्षात घ्यावे, असे सांगितले.

(मराठा आरक्षणाबाबत आता पंतप्रधान व राष्ट्रपतींनी तातडीचा निर्णय घ्यावा: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे)

फडणवीसांनी केलेला कायदा सुप्रीम कोर्टानं रद्द केला आहे - अशोक चव्हाणराज्य सरकारने व्यवस्थित पाठपुरावा केला नाही आणि मराठा आरक्षणाबाबत निष्काळजीपणा केला असा आरोप राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्याला आता राज्याचे मंत्री आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिले आहे. "सर्वोच्च न्यायालयाने फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षणाचा केलेला कायदा आज  रद्द केला आहे. भाजपाने त्यावेळी कुणाशीही चर्चा न करता कायदा केला होता. फडणवीसांनी सभागृहात मराठा आरक्षण कायदा फूलप्रूफ आहे, असे वक्तव्य केले होते. फडणवीसांनी ते वक्तव्य आठवावे मग बोलावे. त्यांनी जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नये", असा घणाघात अशोक चव्हाण यांनी केला आहे.

 

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Maratha Reservationमराठा आरक्षणSupreme Courtसर्वोच्च न्यायालयUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाMaharashtraमहाराष्ट्र