शहरं
Join us  
Trending Stories
1
मधुरिमाराजेंची लढण्यापूर्वीच माघार, काँग्रेस आता राजेश लाटकरांना पाठिंबा देणार?
2
अमेरिका आज निवडणार नवा राष्ट्राध्यक्ष, ट्रम्प-हॅरिस यांच्यात हाेणार ऐतिहासिक लढत
3
आजचे राशीभविष्य, ५ नोव्हेंबर २०२४ : घरात आनंदाचे वातावरण राहील, अपूर्ण कामे तडीस जातील
4
राज्यात बंडखोरीचा सार्वत्रिक उद्रेक, तब्बल १५७ बंडखोर रिंगणात, कुठे कुठे काय स्थिती?
5
श्री गणेशपूजेसाठी पंतप्रधानांनी माझ्या घरी येणे चुकीचे नाही, न्या. चंद्रचूड यांनी स्पष्ट केली भूमिका
6
पाच जिल्ह्यांत महिला ठरणार किंगमेकर, १९ विधानसभा मतदारसंघांमध्ये महिलांचे मत असेल निर्णायक, रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक महिला मतदार
7
बंडखोरांमुळे महायुती आणि मविआलाही जबर धक्के; यंदा वाढणार रंगत
8
ठाण्यात वर्चस्वाची लढाई; १९ मतदारसंघांपैकी सहा ठिकाणी बंडखोरीचे ग्रहण, जिल्ह्यात शिंदेसेना, उद्धवसेनासह भाजपही मोठा भाऊ होण्यासाठी प्रयत्नशील
9
अतुल सावेंसमोर हॅट्ट्रिकचे आव्हान, यंदा इम्तियाज जलील यांच्याशी लढत; मतविभागणीचा फायदा होणार?
10
पोलिसांची अशीही भाऊबीज भेट, डोंबिवलीत रिक्षात हरवलेली बॅग महिलेला दिली शोधून
11
कार्तिकी यात्रा सोहळा :दिंडीधारकांच्या निवाऱ्यासाठी पंढरपुरात ४५० प्लॉट उपलब्ध, बुधवारपासून प्लॉट नोंदणी सुरू होणार
12
डायमंड कंपनीच्या मॅनेजरचा संशयास्पद मृत्यू, ग्रँटरोडच्या ‘त्या’ खोलीत नेमके घडले काय?
13
‘इंडिगो’च्या विमानांत १४ नोव्हेंबरपासून बिझनेस क्लास
14
मराठी विषय घेऊ न देणाऱ्या कॉलेजांची चाैकशी, विद्यापीठाकडून समिती स्थापन
15
दिवाळीचा मुहूर्तही कापूस खरेदीविना, शेतकऱ्यांना प्रतीक्षा, खरेदी केंद्र सुरू केले नसल्याने भाव पडण्याची भीती
16
काँग्रेस कोल्हापुरात कुकर चिन्हावर लढणार? राजू लाटकर यांचे चिन्ह जाहीर, उद्या पुढची दिशा ठरणार...
17
Satej Patil: सतेज पाटलांच्या डोळ्यांत अश्रू तरळले; "दुपारी २.३६ मिनिटांनी मालोजीराजेंचा फोन आला"
18
अटकेपार झेंडे फडकावले आमच्या मराठे शाहीने अन् इथे व्यासपीठावर मुली नाचवतायत? राज ठाकरे कुणावर संतापले?
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी नॉट रिचेबल नव्हतो, सतेज पाटीलच..."; मधुरिमाराजेंच्या माघारीनंतर राजेश लाटकरांनी थेटच सांगितलं
20
कोलकाता बलात्कार प्रकरणी ८७ दिवसांनी आरोप निश्चित,दररोज सुनावणी होणार

"मर्दाला मर्द असल्याचे सांगावे लागत नाही", नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2020 6:55 PM

Narayan Rane News : भाजपा नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आज प्रसिद्ध झालेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीवरून उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे.

ठळक मुद्देमुलाखतीत मी मर्द आहे, मी मर्द आहे असं सांगताहेत. मर्दाला मर्द असल्याचं सांगावं लागल नाहीहात धुवत होतो आता हात धुवून मागे लागेन हे वाक्य महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला शोभत नाहीअधोगतीकडे नेणारा कारभार, कोणत्याही विषयाचं ज्ञान नसलेले मुख्यमंत्री यामुळे महाराष्ट्र अधोगतीकडे चालला आहे

सिंधुदुर्ग/मुंबई - महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामध्ये आज प्रसिद्ध झाली आहे. या मुलाखतीवरून आता आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. दरम्यान, भाजपा नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी या मुलाखतीवरून उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. मर्दाला मर्द असल्याचे सांगायची गरज लागत नाही, असा टोला नारायण राणेंनी लगावला आहे.नारायण राणे म्हणाले की, मुलाखतीत मी मर्द आहे, मी मर्द आहे असं सांगताहेत. मर्दाला मर्द असल्याचं सांगावं लागल नाही. आता यांची पण एकदा चाचणी करावी लागेल, असेही नारायण राणे म्हणाले. सरकार पाडून दाखवा, असे आव्हान उद्धव ठाकरे देताहेत. मात्र हे स्वत:च पडणार आहेत, असे भाकितही नारायण राणे यांनी केले.आजच्या मुलाखतीमध्ये विरोधकांना धमक्या देणं, ईडी, सीबीआयला धमक्या देण्याचं काम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. आतापर्यंत हात धुवत होतो आता हात धुवून मागे लागेन हे वाक्य महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला शोभत नाही. हात धुवून कुणाच्या मागे लागणार ईडीच्या, सीबीआयच्या की भाजपाच्या नेत्यांच्या? तुमचं ५६ आमदारांचं सरकार किती दिवस चालेल. केंद्राच्या अखत्यारीतील संस्थांवर राज्य सरकार काय कारवाई करू शकते, अशी विचारणाही नारायण राणेंनी केली.मुख्यमंत्र्यांनी लोकहितासाठी, हिंदुत्वासाठी काय केलं . शेतकऱ्यांसाठी काय केलं, हा प्रश्न आहे. कोरोनाचे बळी आणि रुग्णांच्याबाबतीत महाराष्ट्र राज्य एक नंबर वर आहे. कामामध्ये शून्य आणि याबाबतीत एक नंबर, अशी परिस्थिती आहे, अशी टीका नारायण राणे यांनी केली. तसेच सुशांत सिंह राजपूत आणि दीशा सालियन यांचं प्रकरण आम्ही विसरलेलो नाही, असा इशाराही नारायण राणे यांनी दिला. आपल्याला प्रशासकीय ज्ञान नाही असे उद्धव ठाकरे यांनी कबूल केले आहे, अशी टीकाही नारायण राणे यांनी केली.खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री स्वत: कार चालवत मंत्रालयात गेल्याबद्दल त्यांचं कौतुक केलं आहे. मात्र महाराष्ट्राला कर्तृत्ववान मुख्यमंत्री हवा आहे, ड्रायव्हर नको, असा टोला नारायण राणे यांनी लगावला. एक वर्षाचा निष्क्रिय कारभार, अधोगतीकडे नेणारा कारभार, कोणत्याही विषयाचं ज्ञान नसलेले मुख्यमंत्री यामुळे महाराष्ट्र अधोगतीकडे चालला आहे. याला शिवसेनेसोबतच अन्य दोन घटकपक्षही जबाबदार आहे, असा आरोपही नारायण राणेंनी केला.हात धुवून मागे लागण्याच्या धमक्या देऊ नका, कोण कुणाच्या मागे लागेल हे कळेल. आम्ही मागे लागलो तर झोप येऊ देणार नाही. १०० जणांच्या कुंडल्या माहिती आहेत. बंद दरवाजा आडच्या मातोश्रीच्या आतल्या आणि बाहेरच्याही अनेक गोष्टी ठावूक आहेत, असा इशारा नारायण राणे यांनी दिला आहे.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाPoliticsराजकारण