मुंबई: अभिनेत्री कंगना राणौतनं मुंबईवरून केलेल्या विधानावरून वाद निर्माण झाला आहे. यावरून कंगना आणि शिवसेना यांच्यात वाकयुद्ध रंगलं आहे. या वादावर आता भाजप आमदार नितेश राणेंनी ट्विट करून भाष्य केलं आहे. त्यामुळे आता शिवसेना विरुद्ध कंगना पाठोपाठ शिवसेना विरुद्घ राणे असा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.शिवसेना विरुद्ध कंगना वादावर नितेश राणेंनी अतिशय सूचक ट्विट केलं आहे. 'कंगना तर फक्त बहाणा आहे. सुशांत सिंह राजूपत आणि दिशा सालियन प्रकरणावरून लक्ष विचलित करायचं आहे. बेबी पेंग्विनला वाचवायचं आहे. यापेक्षा जास्त काही नाही,' असं नितेश राणेंनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
शिवसेना विरुद्ध कंगना; वाद पेटलाकंगना राणौतनं मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्यानंतर वाद पेटला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यानंतर शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी कंगना विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. 'कंगनाला खासदार संजय राऊत यांनी सौम्य शब्दांत समज दिली. ती इथे आली तर आमच्या रणरागिणी तिचे थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाहीत. उद्योजक व सेलेब्रिटी घडवणाऱ्या मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणाऱ्या कंगनावर देशद्रोही म्हणून गुन्हा दाखल करण्याची मी गृहमंत्र्यांना मागणी करणार आहे, असं सरनाईक म्हणाले.
सरनाईक यांच्या विधानाची राष्ट्रीय महिला आयोगाकडून दखल; सरनाईक विधानावर ठामभाजपनं राष्ट्रीय महिला आयोगाला हाताशी धरून मला अटक करायचा खेळ रचला आहे. पण लक्षात ठेवा, मुंबई आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी मला कितीही वेळा तुरुंगात जावे लागले तरी मी तयार आहे, अशी रोखठोक भूमिका सरनाईक यांनी घेतली आहे. मी माझ्या विधानावर ठाम आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत १०६ वीरांनी पत्करलेल्या हौतात्म्यामुळे मुंबई महाराष्ट्राला मिळाली. त्या मराठी माणसाच्या रक्त सांडून मिळवलेल्या मुंबई बद्दल कोणीही काहीही बोलेल तर खपवून घेणार नाही, असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला आहे. त्यामुळे कंगना विरुद्ध शिवसेना हा वाद पुढील काही दिवस सुरूच राहणार असल्याचं दिसत आहे.
मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणाऱ्या कंगनाला उपरतीचहुबाजूंनी टीकेची झोड उठल्यानंतर कंगनानं मुंबईबाबतच्या आपल्या भावना ट्विट करून व्यक्त केल्या. त्यात ती म्हणते की, महाराष्ट्रामधील माझ्या मित्रांचे आभार मानण्यासाठी माझ्याकडे शब्द अपुरे आहेत. त्यांना माझ्या बोलण्याचा रोख माहीत आहे. तसंच माझी कर्मभूमी असलेल्या मुंबईवर असलेल्या माझ्या प्रेमाचा पुरावा देण्याचीही मला गरज वाटत नाही. मुंबईनं मला नेहमीच यशोदेप्रमाणे सांभाळलं आहे. कंगनावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा; शिवसेनेने केली पोलिसात तक्रारVIDEO: शिवसेना-कंगना वादामागे 'वेगळं'च कारण; मनसेनं सांगितलं राजकारणकंगना रणौतच्या ड्रग्स वक्तव्यावर एक्स-बॉयफ्रेन्ड अध्ययन सुमनची प्रतिक्रिया, म्हणाला - 'मी बोललो तर...'अमृता फडणवीस यांच्याकडून कंगना राणौतची पाठराखण, म्हणाल्या...