शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024:- घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
4
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
6
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
7
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
9
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
10
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
11
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
12
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
13
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
14
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
15
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
16
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
17
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
18
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
19
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
20
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण

राजकारण तापलं! 'मी भ्रष्टाचारी नाही', भाजपा नेत्याने मंदिरात जाऊन घेतली शपथ; 'हे' आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2021 11:52 AM

BJP leader oath in temple corruption charges andhra pradesh chittoor : वायएसआर काँग्रेसचे आमदार शिवप्रसाद रेड्डी यांनी भाजपाचे नेते एस. विष्णुवर्धन रेड्डी यांच्यावर भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप केला होता.

नवी दिल्ली - आंध्र प्रदेशमध्ये (Andhra Pradesh) भाजपा आणि वायएसआर काँग्रेस यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांचं युद्ध आता एका नव्या वळणावर येऊन पोहोचलं आहे. वायएसआर काँग्रेसचे आमदार शिवप्रसाद रेड्डी यांनी भाजपाचे नेते एस. विष्णुवर्धन रेड्डी यांच्यावर भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप केला होता. यावरून राजकारण तापलं आहे. आपल्यावर झालेल्या आरोपानंतर भाजपाचे नेते एका मंदिरात पोहोचले आणि तिथे 'मी भ्रष्टाचारी नाही' अशी शपथ घेतल्याची घटना घडली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, भाजपाचे नेते जी. विष्णुवर्धन रेड्डी चित्तूर जिल्ह्यातील विनायकस्वामी मंदिरात पोहोचले. जिथे त्यांनी देवासमोर 25 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत कधीच भ्रष्टाचार केला नसल्याची शपथ घेतली आहे. प्रॉद्दातूर परिसरातील टिपू सुलतानच्या पुतळ्यावरून हा वाद निर्माण झाला आहे. भाजपा याला विरोध करत आहे आणि स्थानिक प्रशासनाला पुतळा बसवू देत नाही. ज्यानंतर वायएसआर काँग्रेसचे आमदार शिवप्रसाद रेड्डी यांनी भाजपा नेत्यावर भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे. 

वादविवादानंतर गेल्या आठवड्यात भाजपा नेत्याने आव्हान दिलं होतं की, ते भ्रष्ट नसल्याची मंदिरात देवासमोर येऊन शपथ घेतील. त्यांनी वायएसआर काँग्रेसच्या नेत्यालाही असं करण्यास सांगितलं. मात्र, जेव्हा आमदार मंदिरात पोहोचले नाहीत, तेव्हा मंदिरात न येण्याचा अर्थ नेमका काय काढायचा हे लोकांवर सोपवू असं भाजपा नेत्याने म्हटलं आहे. आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या राजकारणात हे असं पहिल्यांदा झालेलं नाही. याआधीही नेते मंडळींनी एकमेकांवर निशाणा साधताना देवाचा आधार घेतला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

खळबळजनक! भाजपा कार्यकर्त्याच्या पत्नीवर 6 जणांचा सामूहिक बलात्कार; आरोपींपैकी 2 जण TMC चे कार्यकर्ते 

पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) एक भयंकर घटना समोर आली आहे. भाजपा कार्यकर्त्याच्या पत्नीवर सहा जणांकडून सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपींपैकी दोन जण तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत. ही महिला स्थानिक भाजपा कार्यकर्त्याची पत्नी असल्याचं सांगितलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 34 वर्षीय महिलेवर तिच्याच घरात सहा जणांकडून सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून राजकारण तापलं आहे. 

टॅग्स :BJPभाजपाAndhra Pradeshआंध्र प्रदेशPoliticsराजकारणIndiaभारत