काँग्रेसवर भाजपचा पलटवार; कोरोनावरून पंतप्रधान मोदींची बदनामी करण्याचा प्रयत्न : संबित पात्रा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2021 02:53 PM2021-05-18T14:53:57+5:302021-05-18T14:55:51+5:30

संबित पात्रा यांनी दाखवलं काँग्रेसची कथित टूलकिट. काँग्रेस धर्माच्या आधारे राजकारण करत असल्याचा पात्रा यांचा आरोप.

bjp leader sambit patra slams congress coronavirus modi central vista ventilators showed toolkit | काँग्रेसवर भाजपचा पलटवार; कोरोनावरून पंतप्रधान मोदींची बदनामी करण्याचा प्रयत्न : संबित पात्रा

काँग्रेसवर भाजपचा पलटवार; कोरोनावरून पंतप्रधान मोदींची बदनामी करण्याचा प्रयत्न : संबित पात्रा

Next
ठळक मुद्देसंबित पात्रा यांनी दाखवलं काँग्रेसची कथित टूलकिट.काँग्रेस धर्माच्या आधारे राजकारण करत असल्याचा पात्रा यांचा आरोप.

भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी कोरोनावरून सुरु असलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनमी माध्यमांशी संवाद साधताना कांग्रेसची एक कथिट टूलकिट दाखवली. यावेळी त्यांनी काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी आणि काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर निशाणा साधला. "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात अयोग्य शब्दांचा वापर करण्यास सांगण्यात आलं आहे. इंडियन स्ट्रेनला मोदी स्ट्रेन म्हणायचं आहे. कुंभला सुपर स्प्रेडरप्रमाणे सांगायचं आहे. परंतु ईदला काहीच म्हणायचं नाही," असं पात्रा यांनी कथित टूलकिट दाखवताना म्हटलं.
 
"ज्यावेळी इंडियन स्ट्रेनचा उल्लेख होईल त्यावेळी त्याला सोशल मीडिया वॉलेंटियर्सनं मोदी शब्दाचा वापर करावा. जो नवा स्ट्रेन आला आहे त्याला इंडियन स्ट्रेन असा उल्लेख करू नये असं म्हटलं आहे. त्याच्या वैज्ञानिक नावाचा उल्लख करावा. परंतु काँग्रेस कुठे ना कुठे जागतिक आरोग्य संघटनेच्या विरोधात जाऊन त्याला इंडियन स्ट्रेन असं म्हणण्यास सांगितलं आणि त्यापेक्षाही पुझे त्याला मोदी स्ट्रेन असा उल्लेख करण्यास सांगितलं," असं पात्रा म्हणाले. ही अतिशय खेदजनक बाब आहे आणि जगात भारताचा अपमान करण्यासाठी विषाणूच्या स्ट्रेनला भारताच्या नावावर, पंतप्रधानांच्या नावे बोलावण्याचे चेष्टा करण्यात आली आहे. हे काँग्रेसचं खरं रुप दाखवत आहे," असंही ते म्हणाले. 



राहुल, सोनिया गांधींवरही निशाणा

यावेळी संबित पात्रा यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. "जे रोज सकाळी उठून राहुल गांधी जे ट्वीट करत होते आज ती कागदपत्रे माझ्या हाती आली आहेत, ज्याच्या माध्यमातून ते ट्वीट करत होते. यामध्ये मिसिंग अमित शाह, क्वारंटाईन जयशंकर, साईडलाईन राजनाथ सिंग, इनसेन्टिव्ह निर्मला सीतारामन अशा अनेक शब्दांचा वापर करण्यात आलं आहे. काही मासिकांत मिसिंग गव्हर्नंन्स, मिसिंग गव्हर्मेंट अशाप्रकारचे फोटो छापा आणि अखेर मोदींना सारखं सारखं पत्र लिहा असंही लिहिण्यात आलं आहे," पात्रा म्हणाले. 

या कागदपत्रांमध्ये लिहिलंय आम्हाला पीएम केयर्स बाबत अनेक प्रश्न उपस्थित करायचे आहेत. वेंटिलेटर्सची बदनामी करायची आहे.  सेंट्रेल विस्तावर प्रश्न उपस्थित करायचे आहेत, त्याला मोदी महल असं नाव द्यायचंय. दररोज मी कोणत्याही चर्चासत्राला जातो तेव्हा काँग्रेसचे प्रवक्ते त्याला मोदी महल म्हणतात आणि कागदपत्रांमध्येही तेच लिहिल्याचं ते म्हणाले.

Web Title: bjp leader sambit patra slams congress coronavirus modi central vista ventilators showed toolkit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.