भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी कोरोनावरून सुरु असलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनमी माध्यमांशी संवाद साधताना कांग्रेसची एक कथिट टूलकिट दाखवली. यावेळी त्यांनी काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी आणि काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर निशाणा साधला. "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात अयोग्य शब्दांचा वापर करण्यास सांगण्यात आलं आहे. इंडियन स्ट्रेनला मोदी स्ट्रेन म्हणायचं आहे. कुंभला सुपर स्प्रेडरप्रमाणे सांगायचं आहे. परंतु ईदला काहीच म्हणायचं नाही," असं पात्रा यांनी कथित टूलकिट दाखवताना म्हटलं. "ज्यावेळी इंडियन स्ट्रेनचा उल्लेख होईल त्यावेळी त्याला सोशल मीडिया वॉलेंटियर्सनं मोदी शब्दाचा वापर करावा. जो नवा स्ट्रेन आला आहे त्याला इंडियन स्ट्रेन असा उल्लेख करू नये असं म्हटलं आहे. त्याच्या वैज्ञानिक नावाचा उल्लख करावा. परंतु काँग्रेस कुठे ना कुठे जागतिक आरोग्य संघटनेच्या विरोधात जाऊन त्याला इंडियन स्ट्रेन असं म्हणण्यास सांगितलं आणि त्यापेक्षाही पुझे त्याला मोदी स्ट्रेन असा उल्लेख करण्यास सांगितलं," असं पात्रा म्हणाले. ही अतिशय खेदजनक बाब आहे आणि जगात भारताचा अपमान करण्यासाठी विषाणूच्या स्ट्रेनला भारताच्या नावावर, पंतप्रधानांच्या नावे बोलावण्याचे चेष्टा करण्यात आली आहे. हे काँग्रेसचं खरं रुप दाखवत आहे," असंही ते म्हणाले.
काँग्रेसवर भाजपचा पलटवार; कोरोनावरून पंतप्रधान मोदींची बदनामी करण्याचा प्रयत्न : संबित पात्रा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2021 14:55 IST
संबित पात्रा यांनी दाखवलं काँग्रेसची कथित टूलकिट. काँग्रेस धर्माच्या आधारे राजकारण करत असल्याचा पात्रा यांचा आरोप.
काँग्रेसवर भाजपचा पलटवार; कोरोनावरून पंतप्रधान मोदींची बदनामी करण्याचा प्रयत्न : संबित पात्रा
ठळक मुद्देसंबित पात्रा यांनी दाखवलं काँग्रेसची कथित टूलकिट.काँग्रेस धर्माच्या आधारे राजकारण करत असल्याचा पात्रा यांचा आरोप.