"आता सगळ्यांना पवित्र व्हावं लागेल आणि ते काम सीबीआयच करेल"
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2021 07:45 AM2021-01-02T07:45:44+5:302021-01-02T07:51:37+5:30
BJP And TMC : भाजपा आणि तृणमूल काँग्रेसचे नेते आमनेसामने आले आहेत. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत.
नवी दिल्ली - पश्चिम बंगालमध्ये निवडणुका होत असून सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. भाजपा आणि तृणमूल काँग्रेसचे नेते आमनेसामने आले आहेत. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. याच दरम्यान टीव्हीवरील एका शो मध्ये चर्चेसाठी नेतेमंडळीना बोलवण्यात आलं असता त्यांनी एकमेकांवर विविध मुद्द्यांवरून टीकास्त्र सोडलं आहे. पश्चिम बंगालमधील तृणमूल काँगेसच्या काही नेत्यांवर सीबीआयची कारवाई होत असल्याचा मुद्दा चर्चेसाठी उपस्थित झाला होता. या मुद्द्यावरून वाद सुरू झाला आणि दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकमेकांना घेरण्यास सुरुवात केली.
सीबीआयने कोलकातामध्ये एका तृणमूल काँग्रेस नेत्याच्या घर आणि कार्यालयासह काही ठिकाणांवर छापेमारी केली. गोवंश तस्करीच्या प्रकरणात सीबीआयने तृणमूल काँग्रेसच्या नेत्यावर ही कारवाई केली. या कारवाईबाबत तृणमूलचे नेत्यांनी भाजपा सरकारच्या हस्तक्षेपाचा मुद्दा उपस्थित केला. या मुद्द्यांवरून भाजपाचे प्रवक्ते जफर इस्लाम यांनी टीएमसी नेते विवेक गुप्ता यांना चांगलेच खडे बोल सुनावले आहेत. "सीबीआय ही एक स्वायत्त संस्था आहे. मला या संस्थेचा आदर आहे. पण कधीकधी मला असा संशय येतो की या संस्थांना राजकीय चावी लावली जाते आहे" असं विवेक गुप्ता यांनी म्हटलं आहे.
शहीद स्मारकाच्या भूमीपूजन सोहळयात भाजपा आमदाराने घातला गोंधळ https://t.co/m04lQWfKZ1#BJP#Video
— Lokmat (@MiLOKMAT) December 28, 2020
"तृणमूल काँग्रेसने आता एक लक्षात ठेवलं पाहिजे की तुमचे जाण्याचे दिवस आले"
भाजपाचे प्रवक्ते जफर इस्लाम यांनी गुप्ता यांना उत्तर दिलं आहे. "पश्चिम बंगालमध्ये काम करणारे भाजपाचे कार्यकर्ते परप्रांतीय आणि तृणमूलचे कार्यकर्ते भूमिपुत्र अशी एक नवी संकल्पना मांडली जात आहे. पण तृणमूल काँग्रेसने आता एक लक्षात ठेवलं पाहिजे की तुमचे जाण्याचे दिवस आले. जाताजाता एक चांगलं काम करून जा. ते म्हणजे ज्या गुन्हेगारांना तुम्ही संरक्षण दिलं आहे त्यांना पाठिशी घालू नका. आणि प्रश्न राहिला सीबीआयचा… सीबीआय स्वतंत्र संस्था आहे. ते त्यांचं काम योग्यप्रकारे करतील. आता सगळ्यांना पवित्र व्हावं लागेल आणि ते काम सीबीआयच करेल" असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
भाजपाचा ममतांना 'धक्के पे धक्का'!; आता हा बडा नेता 5,000 कार्यकर्त्यांसह हातात घेणार 'कमळ'
ममता बॅनर्जी यांना भाजपाकडून एका पाठोपाठ एक हादरे देणं सुरूच आहे. नुकताच सुबेंदू अधिकारी यांनी तृणमूल काँग्रेसला राम-राम ठोकत भाजपामध्ये प्रवेश केला. यानंतर आता आपला भाऊ आणि तृणमूल काँग्रेसचे नेते सौमेंदू अनेक कार्यकर्त्यांसह भाजपामध्ये सामील होणार असल्याचे सुवेंदू यांनी शुक्रवारी सांगितले. सौमेंदू यांना नुकतेच कोन्टाई नगरपालिकेच्या प्रशासक पदावरून दूर करण्यात आले होते. सुवेंदू यांनी पूर्व मिदनापूर येथे एका बैठकीत सांगितले, की माझा भाऊ सौमेंदू काही नगरसेवक आणि तृणमूल काँग्रेसच्या 5,000 कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश करणार आहे. सौमेंदू कोन्टाई येथे शुक्रवारी सायंकाळी भाजपात प्रवेश करतील. यामुळे आता तृणमूल काँग्रेसचा विनाश अटळ असल्याचेही ते म्हणाले.
"मोदींना शेतकऱ्यांची जखम व उपचारही माहितीहेत पण दुखणे पोटाला व प्लास्टर पायाला अशी तऱ्हा"https://t.co/GtBE9inHT5#ShivSena#BJP#ModiGovt#farmersrprotest#RahulGandhipic.twitter.com/6nqSweZDhS
— Lokmat (@MiLOKMAT) December 28, 2020