शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

महाराष्ट्रातील भाजपा नेते अडचणीत; झारखंड सरकार पाडण्याचं षडयंत्र उघड झाल्यानं खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2021 7:45 AM

झारखंड षड् यंत्राची महाराष्ट्रात चाैकशी?; आराेपींना भेटले राज्यातील भाजप नेते

ठळक मुद्देझारखंडमध्ये आमदारांचा घाेडेबाजार करून सरकार पाडण्याचा कट रचण्यात आला हाेता. पाेलिसांनी एका हाॅटेलमधून अभिषेक दुबे, अमित सिंह आणि निवारण महताे यांना अटक केलीपोलिसांनी छापा टाकण्याच्या १५ मिनीटांपूर्वीच हे सर्व नेते निघून गेले हाेते. अन्यथा त्यांनाही अटक झाली असती.

एस. पी. सिन्हारांची : झारखंडमध्ये हेमंत साेरेन यांचे सरकार पाडण्याच्या षड्यंत्राचा पाेलिसांनी भांडाफाेड केल्यानंतर खळबळ उडाली आहे. याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या आराेपींचे महाराष्ट्र कनेक्शन समाेर आले आहे. मात्र, पाेलिसांनी केलेल्या या कारवाईवरच आता संशय व्यक्त करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील भाजप पदाधिकाऱ्यांच्या भेटींमागे हवाला कनेक्शनचा शक्यता असून ते लपविण्यासाठी सरकार पाडण्याचा कट असल्याचे प्रकरण पाेलीसांनी उभे केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.  याप्रकरणी महाराष्ट्रातील नेत्यांची चाैकशी हाेण्याची शक्यता आहे.

झारखंडमध्ये आमदारांचा घाेडेबाजार करून सरकार पाडण्याचा कट रचण्यात आला हाेता. याबाबत आमदार अनुप सिंह यांनी केलेल्या तक्रारीवरून पाेलिसांनी छापे मारले हाेते. पाेलिसांनी एका हाॅटेलमधून अभिषेक दुबे, अमित सिंह आणि निवारण महताे यांना अटक केली हाेती. हे तिघे २१ जुलैला जयकुमार बेलखोडे, माेहित कंबाेज, अनिल कुमार, जयकुमार शंकरराव आणि आशुताेष ठक्कर यांना हाॅटेल ली-लॅकमध्ये भेटल्याचा दावा पाेलिसांनी केला आहे. पोलिसांनी छापा टाकण्याच्या १५ मिनीटांपूर्वीच हे सर्व नेते निघून गेले हाेते. अन्यथा त्यांनाही अटक झाली असती. बेलखोडे हा भाजपचे माजी आमदार व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा भाचा आहे, तर माेहित कंबाेज हे मुंबईतील माेठे व्यावसायिक व मुंबई प्रदेश भाजपचे माजी उपाध्यक्ष आहेत, तर दुबे हा फळ विक्रेता असून, सिंह हा ठेकेदार आहे.

झारखंडमध्ये भाजपचे २५ आमदार आहेत. बहुमतासाठी ४२ आमदारांचे समर्थन आवश्यक आहे. त्यामुळे झारखंडमध्ये सरकार पाडणे भाजपसाठी साेपे नाही. त्यातच संशयित आराेपी असलेले किरकाेळ व्यावसायिक आणि महाराष्ट्रातील भाजप नेत्यांच्या मदतीने सरकार पाडण्याचे कारस्थान रचण्याची काय गरज पडली? झारखंडमध्ये नेत्यांची कमतरता आहे का? असे प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. रांची पाेलिसांनी याप्रकरणी एसआयटी स्थापन केली आहे. चार पथके हाॅटेलपासून विमानतळापर्यंत विविध ठिकाणी तपासामध्ये गुंतले आहेत. 

एसआयटी नेमून चौकशी करामाजी मुख्यमंत्री बाबुलाल मरांडी यांनी साेरेन सरकारवर महाराष्ट्राप्रमाणेच पाेलिसांचा गैरवापर करण्यात येत असल्याचा आराेप केला आहे. या एकूण प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन करून चाैकशी करण्याची मागणी मरांडी यांनी केली आहे.

महाराष्ट्रातील नेत्याचे हवाला कनेक्शन?महाराष्ट्रातून रांचीला आलेल्या लाेकांचे हवाला कनेक्शनदेखील असण्याचा दाट संशय सूत्रांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्र, झारखंड, बिहार आणि छत्तीसगढचा परिसर हवाला काॅरीडाेर म्हणून ओळखला जाताे. माेठ्या आर्थिक देवाण-घेवाणीसंदर्भात महाराष्ट्रातील पदाधिकारी आराेपींना भेटले असावे. मात्र, पाेलिसांनी हवालाऐवजी सरकार पाडण्याच्या कटाचे प्रकरण उभे केले. हवाला ॲंगलमध्ये राज्यातील बडे नेते अडकले असते आणि परिणामी सरकारची बदनामी झाली असती, असे सूत्रांचे म्हणणे आहे. यावरुन अनेक आमदारांनीही वक्तव्ये केली आहेत.

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेसPoliceपोलिस