धुळे:भाजपा आमदार आशिष शेलार सध्या तीन दिवसांच्या उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. आज त्यांनी धुळे येथे संघटनात्मक बैठका घेतल्या. त्यानंतर पत्रकार परिषदेत आघाडी सरकारवर निशाणा साधला. राज्य सरकारने पूरग्रस्तांना दिलेले पॅकेज हे वर्तमानपत्रातील प्रसिद्धीची बातमी असल्याचे म्हटले. तसेच, उद्धव ठाकरेंनी पूरग्रस्तांना मदत करू असे सांगितले होतं, पण त्यांनी पॅकेज घोषित केल्याने मुख्यमंऱ्यांनी दिलेला शब्द फिरवला आहे, असा घणाघातही केला.
राज्य सरकारने लॉकडाऊनबाबत दिलेली शिथिलता आहे की जनतेची छळवणूक आहे, हे नागरिकांना कळत नाही आणि राज्य सरकारच्या मंत्र्यांनाही कळत नाही. लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना लोकलमध्ये प्रवास दिला जात नाही, याबाबत उच्च न्यायालयाने देखील सवाल विचारला आहे. एकीकडे सर्व सामान्यांना प्रवास द्यायचा नाही, दुसरीकडे शासकीय कार्यालये पूर्ण क्षमतेने भरणार. ही शासनाची दुट्टपी भूमिका असल्याची टीका शेलार यांनी केली.
राज्य सरकार भ्रष्टाचारांचयावेळी शेलारांनी राज्य सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोपही केले. राज्याचे सरकार हे लुटो, बाटो आणि खाओ असे हे तिघाडी सरकार आहे. सरकारमध्ये पोलिसांच्या बदल्यामध्ये दलाली सुरू आहे, त्यामुळे पोलिसांचे मानसिक खच्चीकरण होत आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्तेचा प्रश्न निर्माण झालाय. राज्यातील अनेक अधिकारी केंद्राच्या सेवेत सामिल झालेत, त्यामुळे राज्याची व्यवस्था कोलमडली आहे. हे सरकार शेतकऱ्यांचं नसून भ्रष्टाचाऱ्यांचं असल्याची टीकाही शेलारांनी केलीय.