'अजित पवारांनी भाषेबद्दल बोलणं म्हणजे राज कुंद्रांनी कुठला पिक्चर बघावा हे सांगण्यासारखं'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2021 03:53 PM2021-07-29T15:53:06+5:302021-07-29T15:53:21+5:30

Nitesh Rane Attacked Ajit pawar: 'कुठली भाषा वापरावी हे अजित पवारांनी अजित पवारांनी सांगू नये.'

BJP MLA Nitesh Rane slams Ajit pawar over Narayan Rane's Comment On Cm Uddhav Thackeray | 'अजित पवारांनी भाषेबद्दल बोलणं म्हणजे राज कुंद्रांनी कुठला पिक्चर बघावा हे सांगण्यासारखं'

'अजित पवारांनी भाषेबद्दल बोलणं म्हणजे राज कुंद्रांनी कुठला पिक्चर बघावा हे सांगण्यासारखं'

googlenewsNext
ठळक मुद्दे'काही लोक पूरग्रस्तांच्या पाहणीसाठी येतात की अधिकाऱ्यांना बघण्यासाठी येतात हा प्रश्न निर्माण झाला आहे.'

सिंधुदुर्ग: भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेवरुन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राणेंचा समाचार घेतला होता. त्यानंतर आता भाजप आमदार आणि नारायण राणेंचे सुपुत्र नितेश राणे यांनी अजित पवारांवर जहरी टीका केली आहे. 'कुठली भाषा वापरावी हे अजित पवारांनी सांगण म्हणजे राज कुंद्रांनी कुठला चित्रपट बघावा सांगण्यासारखं आहे,' असे नितेश राणे म्हणाले. 

नुकतच नारायण राणेंनी पूरग्रस्त चिपळूणचा दौरा केला. त्यावेळी अधिकाऱ्यांना झापताना त्यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. मी पाहणी करुन झाली तरी एकही अधिकारी मला येऊन भेटला नाही, हे काही बरोबर नाही, असे ते म्हणाले. त्यानंतर अधिकारी सीएमसाहेबांना निरोप देण्यासाठी गेले आहेत, असं समोरील अधिकाऱ्याने सांगताच, सीएम बीएम गेला उडत, मला कुणाची नावं सांगू नका', असा टोला राणेंनी लगावला.

काय म्हणाले होते अजित पवार ?
काही लोक पूरग्रस्तांच्या पाहणीसाठी येतात की अधिकाऱ्यांना बघण्यासाठी येतात हा प्रश्न निर्माण झाला आहे. मुख्यमंत्र्यांबाबत एवढ्या खालच्या स्तराची भाषा कधीही वापरली नव्हती. यशवंतराव चव्हाणांपासून, शरद पवारांपर्यंत अनेक मुख्यमंत्री झाले. मात्र अशाप्रकारची भाषा कोणत्याही विरोधी पक्षाने किंवा त्यांच्या पक्षातील इतर नेत्यांनी वापरली नाही. तुम्ही पूरग्रस्त भागाची पाहणी करायला आलात की मामलेदार, जिल्हाधिकाऱ्यांची पाहणी करायला आलात? अधिकाऱ्यांना पाहण्यासाठी हे लोक दौरा करतात का?", असा हल्लाबोल अजित पवार यांनी केला आहे. 

Web Title: BJP MLA Nitesh Rane slams Ajit pawar over Narayan Rane's Comment On Cm Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.