शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
3
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
4
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
5
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
6
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
7
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
8
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
9
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
10
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
11
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
12
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
13
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
14
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
15
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
16
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
17
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
18
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
19
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
20
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू

UP मध्ये ओवेसींची एन्ट्री; साक्षी महाराज म्हणाले, "आधी बिहारमध्ये मदत केली आता इकडे करतील"

By जयदीप दाभोळकर | Published: January 14, 2021 11:32 AM

यापूर्वीही अनेकदा विरोधकांकडून ओवेसी यांनी भाजपाला मदत केल्याचा करण्यात आला होता आरोप

ठळक मुद्देयापूर्वी अनेकदा विरोधकांकडून ओवेसी यांच्यावर भाजपाला मदत केल्याचा झाला होता आरोपउत्तर प्रदेश, पश्चिम बंगालच्या निवडणुका लढण्याचा ओवेसी यांचा निर्णय

काही दिवसांपूर्वी बिहारमध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांमध्ये असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएम या पक्षानं उत्तम कामगिरी केली होती. त्यानंतर आता ओवेसींनी आपला मोर्चा उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालकडे वळवला आहे. ओवेसी यांनी नुकताच उत्तर प्रदेशचा दौरा केला. तसंच यावेळी त्यांनी आपल्या समर्थकांची आणि आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांची बैठकही घेतली. यादरम्यान बुधवारी भाजपाचे खासदार साक्षी महाराज यांनी एक मोठं वक्तव्य केलं. "ओवेसी यांनी बिहारमध्ये भाजपाची मदत केली. आता पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशातही तसंच होईल," असं ते म्हणाले. बुधवारी दिल्लीला जाण्यापूर्वी साक्षी महाराज यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना ओवेसी यांच्या आझमगढ-जौनपूर दौऱ्याबद्दल सवाल करण्यात आला. तसंच त्यांना नागरिकांकडून मिळणाऱ्या समर्थनाबद्दलही विचारण्यात आलं. "देव त्यांना ताकद देवो, त्यांची साथ देवो, त्यांनी बिहारमध्ये आम्हाला मदत केली होती. आता ते पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशातील मदत करतील," असं वक्तव्य साक्षी महाराज यांनी या प्रश्नांना उत्तर देताना केलं. "आम्ही मुस्लिमांचाही विश्वास मिळवत आहोत. गेल्या ६५ वर्षांपासून भारतातील मुस्लिमांना तुष्टीकरणाच्या नावाखाली घाबरवण्यात आलं. परंतु आज मुस्लिमांना आपलं हित जाणणारा पक्ष हा भाजपा हे समजून आलं आहे. मोठ्या संख्येने मुस्लीम वर्गही भाजपाशी जोडला जात आहे." असंही ते यावेळी म्हणाले.यापूर्वी अनेकदा विरोधी पक्षांनी असदुद्दीन ओवैसी हे भाजपाला मदत करत असल्याचा आरोप केला होता. बिहारच्या निवडणुकांमध्येही एमआयएमला पाच जागांवर विजय मिळाला होता. तसंच अनेक ठिकाणी एमआयएममुळे आघाडीला पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. परंतु आता ओवेसी यांनी आपला पक्ष बिहार आणि उत्तर प्रदेशातील निवडणुकांमध्येही उतरणार असल्याचं म्हटलं आहे. पश्चिम बंगालमध्ये मुस्लीम मतदारांची संख्याही मोठी आहे. या ठिकाणी पुढील वर्षी निवडणुका पार पडणार आहेत.

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनBJPभाजपाSakshi Maharajसाक्षी महाराजUttar Pradeshउत्तर प्रदेशwest bengalपश्चिम बंगाल