रत्नागिरी: केंद्रीयमंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांनी संगमेश्वर पोलिसांनी अटक केली आहे. नारायण राणे यांना घेऊन संगमेश्वर पोलीस महाडला रवाना झाले आहेत. नारायण राणे यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर राज्यभरात याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. दरम्यान, नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर शिवसैनिकांनी राज्यभरात अनेकविध ठिकाणी आंदोलने, निदर्शने केली. यानंतर आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. यानंतर नारायण राणे यांच्याकडून पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. (bjp narayan rane first comment on shiv sena and cm uddhav thackeray)
“शिवसेना नेत्यांनीही अशी वक्तव्य केलीयेत, त्यांच्यावर कुठे गुन्हे दाखल केले?”
संगमेश्वर पोलिसांनी अटक केल्यानंतर नारायण राणे यांनी एका खासगी वृत्तवाहिनीशी संवाद साधत आपली पहिली प्रतिक्रिया दिली. नारायण राणे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना काय सांगाल, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना नारायण राणे म्हणाले की, उद्धव ठाकरेंना जे करायचे आहे ते करू दे, मला जे करायचे आहे ते मी करेन. पुढे उद्धव ठाकरेजी को क्या कहेंगे? असा सवाल केला असता, कुछ नही कहुंगा…, असे राणे म्हणाले.
“ठाकरे सरकारचा धिक्कार, सुरुवात तुम्ही केलीय शेवट आम्ही करु”; भाजपचा शिवसेनेला इशारा
ते कायम थोडी मुख्यमंत्री राहणार आहेत
उद्धव ठाकरेंना जे करायचे आहे ते करू दे, मला जे करायचे आहे ते मी करेन. ते कायम थोडी मुख्यमंत्री राहणार आहेत, अशाप्रकारे ते कायद्याचा गैरवापर करणार असतील तर आम्ही सुद्धा राजाकरणामध्ये आहोत, असे सांगत गोळवली येथील गोळवलकर गुरुजी स्मृती प्रकल्प येथे मी जेवत असतानाच अचानक तिथे डीसीपी आले आणि तुम्हाला अटक करण्यात येत आहे असे मला सांगितले. मी त्यांना नोटीस दाखवा असे म्हटले. तर त्यांच्याकडे नोटीस वगैरे नव्हती. त्यांनी जबरदस्तीने मला अटक करुन इथे संगमेश्वर पोलीस स्थानकामध्ये आणले. त्यानंतर ते एका रुममध्ये गेले आणि दोन तास बाहेर आले नाहीत. मला त्यांचा हेतू चांगला वाटला नाही. माझ्या जीवाला धोका असल्याप्रमाणे त्याच्या हलचाली होत्या. नंतर तिथे अनेक अधिकारी आले, असा घटनाक्रम नारायण राणे यांनी यावेळी सांगितला.
“छत्रपती संभाजी महाराजांनाही संगमेश्वरात अटक झाली होती आणि औरंगजेब सरकार संपलं होतं”
ते कायद्याच्या भाषेत ऑफेन्स होत नाही
मी जे म्हणालो आहे, ते कायद्याच्या भाषेत ऑफेन्स होत नाही. तुम्ही याबद्दल कोणत्याही वकिलाला विचारु शकता. मला जबरदस्तीने लॉकअपमध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. यामध्ये माझा काहीच गुन्हा नाही, असे नारायण राणे यांनी यावेळी सांगितले.