"याला चिंधी विचार म्हणतात, तुम्ही उपमुख्यमंत्री आहात महाराष्ट्राच्या हिताचं बोला", निलेश राणेंचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2021 11:56 AM2021-02-09T11:56:46+5:302021-02-09T11:59:32+5:30

Nilesh Rane And Ajit Pawar : देशात मोगलाई आहे का या अजित पवारांच्या सवालावरुन निलेश राणेंनी टीकास्त्र सोडलं आहे.

BJP Nilesh Rane Slams NCP Ajit Pawar on twitter | "याला चिंधी विचार म्हणतात, तुम्ही उपमुख्यमंत्री आहात महाराष्ट्राच्या हिताचं बोला", निलेश राणेंचा हल्लाबोल

"याला चिंधी विचार म्हणतात, तुम्ही उपमुख्यमंत्री आहात महाराष्ट्राच्या हिताचं बोला", निलेश राणेंचा हल्लाबोल

Next

मुंबई - भाजपाचे नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. देशात मोगलाई आहे का या अजित पवारांच्या सवालावरुन निलेश राणेंनी टीकास्त्र सोडलं आहे. "अजित पवारांना महाराष्ट्रात मोगलाई आहे का असं म्हणायचं होतं, चुकून ते देशात म्हणाले, हेराफेरी करुन पद मिळाल्यावर असं होतं" असं म्हणत निलेश राणेंनी निशाणा साधला आहे. तसेच "याला चिंधी विचार म्हणतात साहेब, तुम्ही उपमुख्यमंत्री आहात महाराष्ट्राच्या हिताचे काहीतरी बोला" असं म्हणत सणसणीत टोला लगावला आहे. 

निलेश राणे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. तसेच अजित पवारांवर पुन्हा जोरदार टीका केली आहे. "अजित पवारांना महाराष्ट्र सरकार म्हणायचं होत चुकून देशात म्हणाले... हेराफेरी करून पद मिळाल्यावर असं होतं. परवा भाषणात कुठेतरी 'मी अनेक वेळा आमदार झालो पण जॅकेट घातलं नाही' म्हणाले, याला चिंधी विचार म्हणतात साहेब तुम्ही उपमुख्यमंत्री आहात महाराष्ट्राच्या हिताचे काहीतरी बोला" असं निलेश राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

काही दिवसांपूर्वी निलेश राणे यांनी जितके गुन्हेगार एका जेलमध्ये नसतील तितके राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहे, अशी जहरी टीका केली होती. निलेश राणे यांच्या या टीकेनंतर उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी देखील प्रत्युत्तर दिलं होतं. निलेश राणे वाट्टेल ते बोलतात आणि त्यावर मी व्यक्त व्हायचे का, असं अजित पवारांनी सांगितले. तसेच त्या निलेश राणेंच्या डोक्यावर परिणाम झाला आहे, असं विधानही अजित पवार यांनी पुण्यातील सर्किट हाऊस येथे बोलताना केलं होत. अजित पवारांच्या या विधानानंतर निलेश राणे यांनी ट्विट करत उपमुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला होता.

"...तर एक दिवस हा निलेश राणे तुमची घमंड उतरविल्याशिवाय राहणार नाही"

निलेश राणे म्हणाले की, फार कमी नेते आहेत की ज्यांना महाराष्ट्रमध्ये अनेक वर्ष मंत्रीपदे मिळाली. मात्र तरीपण महाराष्ट्राच्या विकासामध्ये काही परिणाम झाला नाही. त्यामध्ये अजित पवारांचे नाव घ्यावं लागेल, असं निलेश राणे यांनी सांगितलं. अजित पवारसाहेब भाषा नीट करा नाहीतर हा निलेश राणे तुमची घमंड उतरविल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही निलेश राणे यांनी दिला होता. कोणी त्यांच्या व्यक्तिगत जीवनात काय करावे हा त्यांचा विषय आहे. पण जर आरोप झाले आहेत तर पोलिसांनी चौकशी केलीच पाहिजे. तसेच दुसरं, माहिती लपवणं निवडणूक आयोगानुसार गुन्हा समजला जातो आणि त्या गुन्ह्याखाली धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलाच पाहिजे, अशी मागणी निलेश राणे यांनी केली होती. 


 

Web Title: BJP Nilesh Rane Slams NCP Ajit Pawar on twitter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.